धरणगाव येथे श्री.संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

30

🔹तिळवण तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी धरणगावात उत्साहात साजरी करण्यात आली

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.23डिसेंबर):- येथे श्री संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेलाठी समाजाच्या सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. श्री.संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण धरणगाव पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले.

याप्रसंगी तिळवण तेली समाजाध्यक्ष सुनील चौधरी, अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ, पत्रकार पी.डी.पाटील, पत्रकार निलेश पवार यांसह नाना महाजन, अनिल चौधरी, पोहेकॉ. विनोद संदानशिव, पोहेकॉ. समाधान भागवत, शरद चौधरी, गणेश चौधरी, गोपाल चौधरी, आदी मान्यवरांनी श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. श्री. संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त समाजाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.