इरई ते कवठाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, प्रशासन व जनप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत. युवकांनी बुजवले खड्डे

73

✒️कोरपना(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोरपना(दि.26डिसेंबर):– तालुक्यातील गट ग्रामपंचायत भारोसा इरई येथील गावातील रस्त्या मागील अनेक दिवसापासून खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. पण प्रशासन आणि जनप्रतिनिधी याकडे दुर्लक्षित करत आहे.

गावातील रस्ता गेल्या सात आठ महिण्या पासून अत्यत खराब स्थितीत आहे. याबाबत स्थानिक प्रशासन, लोक प्रतिनिधी यांना वारंवार निवेदन देऊन भ्रमधवनी वरून सांगून देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. इरई येथे येत असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळची बस सुद्धा बंद झाली. खड्डे मुळे नागरिकांना जाण्यायेण्यास नाहक त्रास सहन करावं लागत असल्याने शाळेतील विध्यार्थी देखील आपला जीव मुढीत घेऊन या रस्त्यावरून मार्गक्रमन करून बाहेरगावी शिक्षण घ्यायला जाव लागत आहे.

कुंभकर्णी प्रशासनाला वारंवार सूचना देऊन सुद्धा या रस्त्यावर पडलेले खड्डे बूजवायला प्रशासन गंभीर दिसत नसल्याचे बघता शेवटी इरई येथील तरुण युवकाने निखिल पिदूरकर याच्या नेतृत्वा खाली दि. 25 डिसेंबर ला स्थानिक प्रशासनाला जागे करण्यासाठी या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले.

यावेळी इरई येथील युवक कु. अनिकेत आत्राम, गुलाबचंद भगत, कुणाल वाररकर, देवानंद भोयर, संतोष बोरकर, प्रभुदास वाघधरे कु.प्रतीक आत्राम, बाळकृष्ण भोयर, सुरज मादाळे, धीरज मादाळे, भारत भोयर, स्वंयदीप भगत, हितेश वरारकर, महेश मादाळे, विठ्ठल बोबडे, अविनाश भोयर उपस्थित होते.