हिंदू धर्मगुरू आखाड्याचा त्रिसूत्री कार्यक्रम नागपूर येथे संपन्न

26

✒️डॉ सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.27डिसेंबर):-हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा (कार्यक्षेत्र भारत) च्या अंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित नुतन वर्ष २०२३ च्या वार्षिक कॅलेंडर उदघाटन, नागपुर जिल्ह्यातील नुतन पदाधिकारी नियुक्तीपत्र व डॉ. कृष्णदेव गिरी आंतरराष्ट्रीय योगसदगुरू यांचा ध्यानातून ज्ञानाकडे या विषयावर व्याख्यान असा त्रिसूत्री कार्यक्रम नागपूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश एस. पुरी, जिल्हाध्यक्ष नागपूर यांनी केले होते. सदरचा कार्यक्रम डॉ कृष्णदेव गिरी, आंतरराष्ट्रीय योगसदगुरू यांच्या मान्यतेने, योगेशजी बन यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी नुतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र आणि उपस्थित मान्यवरांना हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा नागपूर जिल्ह्याच्या वतीने सन २०२३ चे कॅलेंडर भेट स्वरूपात देण्यात आहे. तसेच या शुभ प्रसंगी डॉ कृष्णदेव गिरी यांचे ध्यानातून ज्ञानाकडे याविषयी प्रबोधन व गोस्वामी समाजातील युवती कु. साक्षी गिरी हीचे शिवव्याख्यान प्रभावशाली ठरले.

सदरच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार रामदासजी आंबडकर, ऊर्मीला भारती मॅडम, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, साक्षी गिरी शिवव्याख्याता, व्यंकटेश पुरी, प्रदेशाध्यक्ष, महेंद्र गिरी, युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मंगल गिरी (मुनीसर), उपाध्यक्ष, डॉ.सुरेश राठोड , महामंत्री महाराष्ट्र राज्य, हिंदू रक्षा समिती, मेघा गिरी (भारती), विदर्भ विभाग अध्यक्ष, शालिनी पुरी, महिला अध्यक्ष, मराठवाडा, नितीन गिरी(छायाचित्रकार), नम्रता भारती (छायाचित्रकार), विदर्भ विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.