जादुटोण्याच्या संशयावरून एकास भरचौकात भोसकले

52

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.27डिसेंबर):- येथील एकाने पत्नीवर जादुटोणा करण्याच्या संशयावरून शेजारी राहणाऱ्या युवकास भरचौकात चाकूने भोसकून ठार केले.

शिवाजी वार्ड येथे राहणाऱ्या अमोल तुकाराम धुळे वय ३५वर्ष या युवकास त्याच्या शेजारी राहणाऱ्या रमेश वसंता पवार वय ३८वर्ष याने त्याच्या पत्नीवर जादुटोणा करतो अशा संशयावरून अमोल दुकानातून आपले काम आटोपून घरी येत असताना सुभाष चौकात दि.२५डिसेंबर चे राञी ९वाजता चाकूने मांडीवर व गुप्तांगावर सपासप वार करून जागीच ठार केले.मृतक अमोल तुकाराम धुळे हा अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा व निर्व्यसनी होता.तो पुसद येथील एका कापड दुकानात काम करीत होता.

आरोपी रमेश वसंता पवार हा घटनेनंतर कपडे बदलून पळण्याचा तयारीत असताना गोपनीय माहिती वरून पोलिस उपनिरीक्षक राजु खांदवे व त्यांच्या पथकाने एका तासातच आरोपीस शिताफीने पकडले.आरोपीवर अनु.जाती जमाती, कलम ३०२नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकार पंकज मिरखेलकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.तपास कामी पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू खांदवे,हेड कॉन्स्टेबल जलाल शेख, पोलीस कास्टेबल सिद्धोधन भगत,पो.का.आकाश बाभूळकर यांनी चोख कामगिरी बजावत आरोपीस एक तासाच्या आत अटक केली.