व्यसणाधीन गेलेला मानवजातीला लागलेला एक कलंक आहे- पी.एस. खंदारे

45

🔸वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळीच सावध व्हा..!!

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.27डिसेंबर):-भारतीय समाजात दिवसेंदिवस विविध प्रकारचे व्यसनाधीन वाढत चालले आहे. अनादी काळापासून दारू, गांजा, व मादक पदार्थ, सेवन करण्याची जनु काही प्रथाच प्रचलित होत आहे या विरुद्ध जगात सर्वात प्रथम शांतीदुत भगवान गौतम बुद्धाने मानसाला माणूसपणे देण्यासाठी व सर्व मानवजातीला जिवन जगण्याची आचार संहिता दिली त्याला आपण पंचशील म्हणतो या मधील सर्वात महत्वाचे शिल म्हणजे मी कोणत्याही प्रकारचे नशेली पदार्थ सेवन करणार नाही. दारू हि मानसाचे माणूसपण तर हिरावतेच परंतु संपुर्ण घरादाराचे व संपत्तीचे नुकसान देखील करते आणि पत्नी, मुलाबाळांसह आई, वडील व नातेवाईकांना सतत त्रासदायक ठरतात जगात व्यसन केल्याने मानुस सुखी झाला असे एकही उदाहरण नाही उलट व्यसनाचा व्यवसाय करणारा करोडपती आहे व पिणारे शंभर दोनशे एकर जमीन असनारे व्यसनापाई भिकारी बनत चालले आहेत.

आज तरूनाई देखील मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे व्यसन करतांना आपण नित्य पाहतोय दहा ते सतरा वयोगटातील दिड कोटी मुले व्यसनाची शिकार बनले आहेत,सर्वच राजकीय पक्षांचे नेते स्वतः च्या स्वार्थासाठी निवडणुकीमध्ये सर्रास दारू वाटून नवतरूणांना व्यसनी बनवून आपली पोळी भाजून घेण्यासाठी सतत धडपडत असतात हि उज्ज्वल उद्या साठी धोक्याची घंटा असल्याने युवकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. एकतीस डिसेंबर ला नववर्षाच्या स्वागता साठी तरूनाई अतुरलेली असते आणि त्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारचे बिअर बार देखील आकर्षक रोशनाईने सजलेले असतात एका बाटलीवर एक फ्री अशा प्रकारचे अमिश दाखवले जाते, जुन्या आठवणी विसरून नवीन वर्षाचे स्वागत करायचे…

म्हणून नवनवीन मित्र एकत्र बसून पहिला दारूचा अनुभव घेतात व तेथूनच आपल्या जिवन नाशाला प्रारंभ करतात व व्यसन हि प्रतिष्ठा समजतात मित्रांनो नवीन वर्षाचे स्वागत करायचे तर एकमेकांना गुलाब पुष्प भेट घेऊन पेढे वाटून साजरे करा हे सांगण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने दर वर्षी *चला व्यसनाला बदनाम करूया या* हे अभियान राबविण्यात येते पी एस खंदारे व त्यांची टिम शाळा महाविद्यालयात जाऊन युवा पिढीला व्यसनापासून दूर रहावे म्हणून आवाहन करतात व्याख्यान देत जनप्रबोधन करतांना आपण नित्य पाहतोय, दारूच्या प्रतिकात्मक बाटलीला शहरातील प्रतिष्ठित महिला च्या हस्ते बुटा चपलाचा हार घालून व्यसनाला बदनाम करून चौकाचौकत पथनाट्य व व्यसन विरोधी गीत गायन करून जमलेल्या व्यसनाची होळी करण्यात येते व नारा दिला जातो *हॅपी न्यु इयर, हॅपी न्यु इयर, खानार नाही गुटखा, पिणार नाही दारू बीयर.

नो विस्की नो बियर, हॅपी न्यु इयर, हॅपी न्यु इयर. उद्याचे भविष्य ज्या नवतरूणांच्या खांद्यावर आहे ती भावी पिढी निकोप राहणे गरजेचे आहे.