दिंडोरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी संदीप उफाडे यांची निवड

27

✒️नाशिक प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.27डिसेंबर):-दिंडोरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी वरखेडा ता. दिंडोरी येथील संदीप उफाडे यांची एक मताने निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील व राजु शिरसाठ यांनी संदीप उफाडे यांना आज सुपूर्द केले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री संदीप उफाडे यांचा सत्कार करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, व मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव, गोपेगाव चे सरपंच वसंत कावळे, सरपंच राजेंद्र उफाडे, सरपंच गंगाधर निखाडे ,वणीचे प्रशांत भाऊ कड, संतोष रेहरे ,यांचे सहअनेक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.