जांभुळघाट चा सुपुत्र देशाच्या सेवेसाठी पॉरा कमांडो च्या ट्रेनिंगला बेंगलोर ला रवाना..

134

🔹म.रा.मराठी पत्रकार संघ शाखा चिमुर व परीवार तर्फे सत्कार

✒️विशेष प्रतीनीधी(उपक्षम रामटेके)

चिमुर(दि.28डिसेंबर):- चिमुर तालूक्याती मौजा जांभुळघाट येथील दौलतसिंग एफ.जुनी (वय २० वर्ष) तरून देशाच्या शेवेसाठी आज.दि.२८/१२/२०२२ ला कमांडो च्या ट्रेनिंगला बैंगलोर ला रवाना..

एक महीण्या पुर्वी अग्निविर आर्मी भर्ती घेण्यात आली होती या भर्तीत सर्व स्थरावर प्रथम क्रमांक घेत जिल्हात एकमेव पॉरा कमांडो साठी पात्र ठरला.

जांभुळघाट येथे दि.२७/१२/२२ ला निवास्थानी जाऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,शाखा चिमुर चे केवलसिंग जुनी (अध्यक्ष),विलास मोहीनकर (संघटक),कृष्णाकुमार टोंगे (सरचिटणीस),उपक्षम रामटेके (सहसंघटक),सुनिल हिंगणकर (सदस्य) व परीवार तफ्रे पुष्प गुच्छ व शिल देऊन सत्कार करण्यात आला व पुढच्या वाढचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.गाव व परीसरात सर्व स्थरावर कौतुक होत आहे.