आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार – दादासाहेब शेळके

43

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 28 डिसेंबर):-बोथा ता.महागाव येथे 5 घरे असलेल्या बौद्ध समाजाची महिला संरपंच झाल्यामुळे जातीय भावनेतून सर्व ग्राम पंचायत सदस्य बौद्ध महीला संरपंचचा सतत अपमान करणे कुटुंबाला जीव मारण्याचे धमकी देणे कामात हस्तक्षेप करणे राजीनामा दे म्हणून सांगणे सगळ्या परिवाराचा खून करण्या ची धमकी देणे जातिवाचक शिवीगाळ करत असल्या मुळे आरोपीवर अट्रोसिटी अक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपीला आत्तापर्यंत अटक झाली नाही.

त्यामुळे भीम टायगर सेना प्रमुख दादासाहेब शेळके व जेष्ठ कायदे तज्ञ एड.पि.एल. नवसागरे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जोगदंड, ज्येष्ठ पत्रकार तथा भिम टायगर सेना शहर अध्यक्ष सिद्धूभाऊ दिवेकर, तालुकाप्रमुख कैलासदादा कदम पप्पुभाऊ कावळे, विजय लहाने डि.एन.मनवर इत्यादींनी खंडागळे कुटुंबाची भेट घेतली.

यावेळी आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा भिम टायगर सेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचे माहिती दादासाहेब शेळके यांनी आमच्या सिध्दार्थ दिवेकर जिल्हा प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.