माथौली ग्रामपंचायत याच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

70

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.29डिसेंबर):- येथील काही अंतरावर माथोली गाव यांच्या माथोली ग्रामपंचायत यांच्या कडुन निरंजना मुरलीधर पायधन व मंगेश भोयर एम.पी.एस. सी.द्वारे घेण्यात आलेल्या उद्योग निरीक्षक या पदी निवड झाल्याबद्दल तसेच ओबीसी महीला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामपंचायत माथोली,जुगाद कैलासनगर यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित माथोली सरपंच्या सौ. ज्योतीताई सुनील माथुलकर ग्रा.प. सदस्य कुणाल जी. डोळे,माजी सरपंच मनीषा ताई उरकुडे, माजी उपसरपंच सुधाकर बोबडे, नारायण पाटील, गुंजेकर अंगणवाडी सेविका भगत मॅडम, जिल्हा परिषद शिक्षिका बनसोडे मॅडम तसेच गाव परिसरातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.