6 जानेवारीला चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

45

🔹नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासह इतरही मागण्याकडे वेधनार लक्ष

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.30डिसेंबर):-मागील एक दीड वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, आरमोरी, गडचिरोली तालुक्यासह जिल्ह्यातील इतरही भागात जंगलात वाघांची संख्या वाढली आहे. हे वाघ आता नागरिकांच्या जीवावर उठले असून आतापर्यंत नरभक्षक वाघांनी 27 नरपराध शेतकरी महिला नागरिकांचा बळी घेतला आहे. यातील एका नरभक्षक वाघिणीने तब्बल सात नागरिकांचा बळी घेतला आहे. शेतकरी बांधव आपल्या शेतात काम करीत असताना त्यांच्यावर दिवसेंदिवस वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे.

तर दुसरीकडे परराज्यातून आलेल्या जंगली हत्तीने सुद्धा जिल्ह्यात मोठा धुमाकूळ माजवला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे, त्यांच्या शेतीचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे एकीकडे सरकार कमलापूर सारख्या ठिकाणी असलेले पाळीव हत्ती दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करत आहे मात्र या जंगली हत्तीच्या धुमाकूडावर शासन आणि शासनाचा वन विभाग कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे निष्पाप लोकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. सोबतच वन विभागाच्या परवानगीमुळे जिल्ह्यात रस्त्यांचे काम सुद्धा रखडलेले आहे.

या सर्व बाबीकडे आणि इतरही मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी, दुपारी 1वाजता गिरणार चौक चंद्रपूर येथे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानात आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी युवक व महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केलेले आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या जिल्ह्यातील नरभक्षक वाघाचा व जंगली हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, वाघाच्या व जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास विना विलंब तत्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, जिल्ह्यातील वनपट्ट्यांचे प्रलंबित असलेले मागण्या तत्काळ निघाली काढून वनपट्टे देण्यात यावे, सुरजगड येथे होणाऱ्या अवैद्य वृक्षतोडीची चौकशी करून संबंधित कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी, वन विभागाच्या परवानगी करिता रखडलेले जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी, जिल्ह्यात सागवण तस्करीचे प्रमाण वाढलेले असून ते आटोक्यात आणण्याकरिता कटोर पाऊल उचलण्यात यावे, कमलापूर येथील हत्तीचे स्थलांतरन थांबवून पर्यटन स्थळाचा विकास करण्यात यावा व प्रत्येक हत्तीमागे प्रशिक्षित माऊथ व एक चारा कटर देण्यात यावे, जिल्ह्यातील वनमजुरांवर लावण्यात आलेले खोटे आरोप रद्द करण्यात यावे.

जंगली हत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पडीत ठेवल्यामुळे त्यांना एकरी 20 हजार रुपये मदत करण्यात यावी, जंगलव्याप्त परिसरातील शेतांच्या रक्षणासाठी उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना चैन फेन्सिंग ची व्यवस्था करण्यात यावी, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी वन पर्यटन स्थळांचा विकास करण्यात यावा, वन आधारित रोजगार निर्मितीसाठी ठिकठिकाणी कुटीर उद्योग सुरू करण्यात यावे, गडचिरोली जिल्ह्यात वन विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा तातडीने भरण्यात याव्या.