मयुरा इव्हेनमेंटतर्फे आयोजित पुण्यात गेम ऑफ क्राउन्स – अ कल्चरल फॅशन शोमध्ये मिस मध्ये प्रियंका अहिरे, मिसेस कॅटेगरीमध्ये शुभाली जोशी, मिस्टर कॅटेगरीमध्ये अरिअन हुसेन तर किड्स कॅटेगरीमध्ये स्वरा राऊत प्रथम विजेते

31

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.30डिसेंबर):-मयुरा इव्हेनमेंट यांच्यातर्फे आयोजित व मानिनी मानव सेवा ट्रस्ट , मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट , डिजिटल पुणेकर यांच्या सहकार्याने मिस्टर मिस मिसेस व किड्ससाठी गेम ऑफ क्राउन्स – अ कल्चरल फॅशन शोचे आयोजन नुकतेच पुण्यातील सातारा रस्त्यावरील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, वास्तु विशारद तज्ञ आनंद पिंपळकर, समीर देसाई उपस्थित होते. तसेच या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, मॉडेल प्रियंका कुकडे , स्टायलिस्ट तनया साळेकर, शेलार ऑटो चे संचालक मारुती शेलार, मयुरा इव्हेंटमेंटचे मयूर डहाके, मानिनी मानव सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता पिंगळे मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अल्ताफ पिरजादे , मानिनी मानव सेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष दिलीप आबनावे आदी मान्यवर उपस्थित होते.

या फॅशन शोच्या . मिस कॅटेगरीमध्ये प्रियंका अहिरे, मिसेस कॅटेगरीमध्ये शुभाली जोशी, मिस्टर कॅटेगरीमध्ये अरिअन हुसेन तर किड्स कॅटेगरीमध्ये स्वरा राऊत प्रथम विजेते ठरले. तसेच मिस कॅटेगरीमध्ये फर्स्ट रनर अप प्रज्ञा साळवी, सेकंड रनर अप रेवती कुलकर्णी व ऋतू कणसे , मिसेस कॅटेगरीमध्ये फर्स्ट रनर अप स्नेहल जोशी, सेकंड रनर अप मीना कुलकर्णी, मिस्टर कॅटेगरीमध्ये फर्स्ट रनर अप गुलदाद अन्सारी, सेकंड रनर अप अनिकेत बहाळकर, किड्स कॅटेगरीमध्ये फर्स्ट रनर अप शिवतेज शिंदे, सेकंड रनर अप प्रशंसा जाधव हे विजेते ठरले.या फॅशन शो साठी परीक्षक म्हणून मॉडेल श्रेया वर्मा, मॉडेल दिविजा शर्मा, डान्स कोरिओग्राफर उपासना शिंदे, अभिनेते प्रणव पिंपळकर, अभिनेते हर्षल मराठे, मॉडेल श्रेया राज, फॅशन मॉडेल गायत्री ठाकूर यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन मयुरा इव्हेंटमेंटचे मयूर डहाके, मानिनी मानव सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता पिंगळे, मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अल्ताफ पिरजादे, मानिनी मानव सेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष दिलीप आबनावे, मनीषा जाधव,इव्हेंट कॉर्डिनेटर हेमांगी बहाळकर, इव्हेंट मॅनेजर तौसीफ डोंगरीचा, रियाज पिरजादे यांनी केले होते.