नवीन वर्षाचे नवे संकलप घेऊन निघाली चिमूर शहरात सायकल रॅली – आरोग्य आणि पर्यावरणाचा दिला संदेश

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.1जानेवारी):-नवीन वर्षाच्या पहील्याच दिवशी नवीन वर्षाचे नवे संक्लप घेऊन चिमूर शहरात सायकल रली काढण्यात आली सायकल रॅलीला पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी हिरवी झेडी दाखऊन रॅलीची सुरुवात केली.

सायकल ग्रुप चिमूर व एव्हन सायकल लिमिटेड लुधीयाना यांचे संयुक्त विद्यमाने 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी सात वाजता सायकल चालविण्याने व योगा ने आरोग्य सुदृढ कसे ठेवता येईल तसेच पर्यावरण जनजागृती संदेश घेऊन ही रॅली श्रीहरी बालाजी मंदिर चिमूर काढण्यात आली, पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी या रॅली ला हिरवी झेंडी दाखउन सुरुवात केली, चिमूर शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमन करीत अभयंकर मैदान येथे व हुतात्मा स्मारक येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

सायकल रॅली मधे नायब तहसीलदार आशिष फुलके, प्राचार्य सदाशिव मेश्राम, योगा शिक्षक रमेश कंचलवार, सामाजिक कार्यकर्ते सुनील मैंद, प्रशांत तडस, यांनी सुधा सायकल रॅली मधे सहभाग घेतला, सायकल रॅलीला, प्राचार्य सदाशिव मेश्राम, व्यापारी मंडळ चे अध्यक्ष प्रवीण सातपुते, योगा शिक्षक रमेश कंचवारल यांनी मार्गदर्शन केले, सायकल रॅली चा समारोप शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात करण्यात आला,संडे सायकल रॅली यशस्वी करण्याकरिता सुभाष केमये, सुनील पोहनकर, विवेक मारकवार, संतोष महाकालकर, चंद्रकांत पतरंगे, जयंत निवदींग, श्रीकांत झुरमुरे, चेतन रासेकर, सारंग रासेकर व सायकल व पर्यावरण प्रेमी बचत गट व मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले