तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उदंड प्रतिसाद……

38

✒️परभणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जिंतूर-परभणी-(प्रतिनिधी) 50 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालय जिंतूर यांच्याद्वारे दि 30 डिसेंबर 2022 रोजी ज्ञानेश्वर विद्यालय जिंतूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला संपूर्ण तालुक्यातील शाळा व शिक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. विशेषतः जिल्हा परिषद शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. स्वतः काम करण्यापेक्षा इतरांना कामाची प्रेरणा देऊन क्रियाशील करणे जास्त कौशल्याचे असते. वेळोवेळी योग्य व्यक्ती व त्यांच्या कार्यास सुयोग्य प्रोत्साहन देऊन शिक्षण विभागातील अनेकांना क्रियाशील बनविण्याचे कौशल्यपूर्ण काम ज्यांनी गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला त्या क्षणापासून लिलया पेलले. अशा कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकाऱ्यांनी उद्घाटन प्रसंगी सहभागी बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्याचा विचार दिला. विज्ञान प्रदर्शनाचे प्रस्ताविक करताना श्रीमती संगवई (चौधरी) मॅडम यांनी सहभागासाठी नियोजित इयत्ता गटाचे स्वरूप, गुणदानाचे निकष याविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रदर्शनातील प्रयोगाचे परीक्षण करण्यासाठी विज्ञान विषयातील तज्ञ शिक्षकांची परीक्षण समिती गठीत करण्यात आली. पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि गुणदानाच्या सर्व निकषांचा विचार करून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निपक्षपाती पद्धतीने प्रा. वैद्य सर, प्रा. संगवई सर आणि श्री आदाबे सर यांनी परीक्षण केले.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात सहभागी 79 विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक साईकृपा विद्यालय बोरी येथील ओमकार मनोहर गिराम याने, द्वितीय क्रमांक जवाहर प्राथमिक विद्यालय जिंतूर येथिल सार्थक महादेव टार्फे याने तर तृतीय क्रमांक प्राथमिक शाळा डोहरा येथील आदिती बंडू बकान हिने मिळविला.

माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात सहभागी 22 विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक एकलव्य विद्यालय जिंतूर येथील व्यंकटेश गडदे याने, द्वितीय क्रमांक वामनरावजी बोर्डीकर विद्यालय सावळी बु येथील प्रतिक शिंदे तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्रशाला बोरी येथील शेख अमिन शेख मोहसीन यांने मिळविला. तर सहभागी दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसेगाव येथील पार्थ निवृत्ती कऱ्हाळे आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर विद्यालय जिंतूर येथील स्नेहल उमाकांत सानप हिने मिळविला.

प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटात प्रथम क्रमांक जवाहर प्राथमिक विद्यालय जिंतूरचे श्री कनकदंडे पी एस सर यांनी तर माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटात एकलव्य बाल विद्या मंदिर जिंतूरच्या श्रीम. केंद्रे ए बी मॅडम यांनी मिळविला.

विज्ञान प्रदर्शनात विजयी बाल वैज्ञानिकांना आकर्षक स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र तर सहभागी बालवैज्ञानिकांना आकर्षक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आजपर्यंत च्या जिंतूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सर्वात जास्त विद्यार्थी संख्या या वेळी नोंदविली गेली.

स्पर्धा यशस्वीतेसाठी जिंतूर तालुक्याच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विषय साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख मारोती घुगे, केंद्रप्रमुख दिनकर घुगे, श्रीम संगवई, श्री. नालंदे, श्री खलील तसेच ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री वाघ सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाव्हळे सर आणि विद्यार्थ्यांनी केले.