✒️बुलडाणा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बुलडाणा(14जुलै):-करोनाच्या संकटात लॉकडाऊन मध्ये सूट दिलेल्या कालावधी वगळता कर्फ्यु लावण्यात आला आहे. अर्थातच पेट्रोल पंपासाठी ही बाब बंधनकारक आहे. शिवाय कॅनमध्ये अथवा बॉटल मध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी आहे. तसा नियम शिरस्ता देखील आहे. मात्र कॅनमध्ये पेट्रोल न दिल्याच्या कारणावरून आज एका कथित सर्पमित्राने पेट्रोल पंपाच्या केबिन मध्ये साप सोडल्याचा धक्कादायक प्रकार हा मलकापूर रोडवर घडला आहे.
मलकापूर रोड असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावर हा प्रकार आज १३ जुलैला दुपारी घडल्याचे समजते. ही बाब सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे नंतर दुसरा सर्पमित्र बोलवून ते साप पकडण्यात आले. हा प्रकार केलेला अज्ञात सध्या फरार असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. याच पेट्रोल पंपानजिक परवा रात्री काही जणांनी ट्रक चालकाला ही मारहाण केल्याचा घटना समोर आली होती.

राज्यात १ लाख ४४ हजार ५०७ करोनारुग्ण ठणठणीत; रिकव्हरी रेट ५५. ३८%

दरम्यान पेट्रोलपंप मालकांनी दुसऱ्या सर्पमित्रांना संपर्क साधून सोडलेल्या तिन्ही सापांना रेस्क्यू करून बरणीत बंद केले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या धक्कादायक घटनेची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. नियमाने बॉटलमध्ये किंवा बरणीत पेट्रोल देता येत नाही आणि दुपारी तीन नंतर लॉकडाउन असल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याला पेट्रोल देण्यास नकार दिला. यावेळी दोन युवकामधील एक सर्पमित्र युवकाने आपल्या जवळील बरणीत असलेले तीन साप राग्याच्या भरात पंप मालक यांच्या कॅबिनमध्ये, कर्मचाऱ्यांच्या व कॅश रुमध्ये प्रत्येकी एक-एक साप सोडून दिले. सापामध्ये दोन विषारी जातीचे कोब्रा आणि एक धामण जातीचा असे तीन साप समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

क्राईम खबर , बुलढाणा, मिला जुला , विदर्भ, हटके ख़बरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED