नविन वर्षाच्या सुरुवातीलाच शहरात चाकू हल्ल्याचा थरार

68

🔺तरूण युवक गंभीर जखमी

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.3जानेवारी):-शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गुजरी चौकात (जुनी भाजी मंडई) परिसरात आज दि.2 जानेवारीच्या दुपारी साडेतीनच्या दरम्यान एका युवकावर दोन युवकांनी अचानक चाकू हल्ला केल्याची घटना घडली. मावळत्या वर्षात तालुक्यासह शहरात गुन्हेगारीच्या घटनेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते तर अनेकांवर जीवघेणे हल्ले ही झाले होते. शहरासह तालुक्यात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले होते सर्रास बंदुका चालल्या होत्या.

पुन्हा मात्र नववर्षाच्या सुरुवातीलाच शहरात घडलेला या चाकू हल्ल्याच्या थराराने सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान येथील काँग्रेसचे नेते डॉ. मोहम्मद नदिम यांचा पुतण्या ओसामा अहमद शमीम अहमद अंदाजे वय 35 वर्ष हा गुजरी चौक येथे उभा असता दोन युवकांनी त्याच्यावर प्राणघातक चाकू हल्ला केला या घटनेत दोन युवकांना गंभीर दुखापत झाल्या होत्या या युवकांना येथील लाईफ लाईन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचार अर्थ दाखल केले होते.

या प्रकरणी पोलिसांनी दवाखान्यात बयान घेतल्याचे समजते .मात्र यापैकी एका जणाची प्रकृती गंभीर बनल्यामुळे त्यास नांदेड येथे उपचाराकरिता रवाना केल्याचे समजते वृत्त लिहीपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता मात्र घटनास्थळी उभी असलेली बुलेट दुचाकी ही पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणली आहे या हल्ल्यात पूर्व वैमनस्य तसेच टोळी युद्धात आरोपी असलेल्या एका टोळीचा सहभाग असल्याची चर्चा आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत.