भगवतीदेवी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती तथा रक्त तपासणी शिबिर

29

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.4जानेवारी):- इनरव्हील क्लबऑफ उमरखेडच्या अध्यक्षा सौ.शिलाताई कदम सौ.आशाताई देवसरकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाउपाध्यक्ष आणि त्यांची टीम यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंतीचे औचित्य साधून रक्त तपासणी शिबिरात 130 मुलींची रक्त चाचणी करण्यात आली.

दि. 3 जानेवारी 2023 रोज मंगळवारला सकाळी बारा वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. शीलाताई सुरेशराव कदम अध्यक्ष तर प्रमुख अतिथी सौ. सुजाता बनसोड मॅडम एपीआय पोलीस स्टेशन उमरखेड जयश्री देशमुख माजी अध्यक्ष माधुरी देशमुख जिल्हा पर्यावरण अध्यक्ष कविताताई गंगासागर श्वेता जैन वंदनाताई कदम मरसूळकर माजी संचालक आपला जिनप्रेस उमरखेड आरोग्यसंच डॉ. ज्ञानेश्वर बागल युवराज शिंदे करूनाताई गिरी पुष्पाताई जाधव शिरमाळे ताई दिगंबर धोंगडे डॉ. वैभव खिल्लारे एडके साहेब व देवसरी येथील प्रथम नागरिक सरपंच सौ. मीनाक्षीताई चंद्रमणी सावतकर यांनी गीत गायन केल्याबद्दल रोहन कदम यांना पाचशे रुपये बक्षीस दिले. व चंद्रमणी सावतकर देवराव पावडे यांच्या उपस्थित प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

विद्यालयातर्फे सर्व मान्यवरांचा येथोचित सत्कार करण्यात आला. व मुलींच्यारक्त तपासणीस सुरुवात क्रांतीज्योतीच्या जीवनावर प्रथमता प्रास्ताविक आशाताई देवसरकर व विद्यार्थिनी गीत गायन रोहन कदम सुजल राणे खुषी विनायते सानिका शिंदे सुप्रिया बोडके निकिता कदम समीक्षा राणे धनश्री देवसरकर विद्या राणे सुवर्णमाला चव्हाण व प्रमुख अतिथी सौ.सुजाता बनसोड मॅडम पोलीस स्टेशन उमरखेड यांनी अनमोल मार्गदर्शन केले. व विद्यार्थिनींना खंबीर असा आधार दिला मला केव्हाही तुम्ही फोन करू शकता असे उद्गार त्यांनी काढले. तर सौ. वंदनाताई कदम मरसूळकर (कवयित्री) यांनी भाषण कविता सादर केली. व अध्यक्षमहोदय सौ. शीलाताई कदम (कवयित्री) यांनी स्वरचित कविता सावित्रीच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर इनरव्हील क्लब ऑफ उमरखेड मार्फत विद्यार्थ्यांना शक्तिवर्धक औषधीचे बॉटल व इतर औषधी मोफत दिली.यांचे तर्फे विद्यार्थी मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे व दिगंबर माने सर यांचा त्यांनी सत्कार केला. विद्यालयातील हस्तलिखित विविध उपक्रमाची त्यांनी माहिती घेतली व विद्यालयातील विद्यार्थिनीचे वकृत्व खूप सुंदर आहे. अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सुंदर असे संचालन अनिल अल्लडवार यांनी भारदस्त शब्दात चारोळ्याचा भडिमार करत सभेला प्रभावित केले. तर आभार प्रदर्शन पांडुरंग शिरफुले यांनी केले. इनरव्हील क्लबच्या सर्व महिला मंडळींनी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला. व सर्वांनी एकत्रित निसर्गमय वातावरणात भोजनाचा आस्वाद घेतला. विद्यालयाबद्दल सर्वांनी आभार मानले व सौ. माधुरीताई देशमुख यांनी सुरेख तथा गोड आवाजत वंदेमातरम गायन करून सर्वांची मने जिंकली.व कार्यक्रमाचा समारोप केला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक वान्नरे सर शेख सर शिंदे सर सुरोसे सर कबले सर सौ.मिनाताई कदम मॅडम पुरी महाराज चेपुरवार मामा भागवत जाधव यांची उपस्थिती होती.

एकंदरीत इनरव्हील क्लब ऑफ उमरखेड ही सेवाभावी संस्था आहे. यांचे उमरखेड तालुक्यात विविध ठिकाणी सेवाभावी उपक्रम राबवतात गरजू लोकांना मदत करतात. या क्लबचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दल मुख्याध्यापक साहेबांनी प्रशौउद्गार काढले. हे तेवढेच खरे.