महिला मुक्ती दिन बालिका दिन व महिला शिक्षण दिन साजरा

89

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.4जानेवारी):- न.प. हिंदी व मराठी प्रा.शाळा क्र. १ मध्ये दि.३ जानेवारी २०२३ रोजी महिला मुक्ती दिन बालिका दिन व महिला शिक्षण दिन हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न.प.उपमुख्याधिकारी सुरेश राठोड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी अमोल मदने होते.

शाळेचे माजी मुख्याध्यापक संतोष दीक्षित,तसेच मुख्याध्यापक सुनील जाधव,सुनील चव्हाण उपस्थित होते.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचा वेश धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.त्यानंतर काशीनाथ डाखोरे यांनी माझी माय हो सावित्री हे सुंदर गीत सादर केले. त्यानंतर वर्ग दोन मधील विद्यार्थिनी लकीलक्ष्मी नपते तर वर्ग ४ मधून वैष्णवी कांबळे व वर्ग तीसरीच्या श्रद्धा भांडवले व साक्षी पतंगे, बालवाडी मधून पंखुंडी आवते यांनी विचार मांडले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक सुनील जाधव,मुख्याध्यापक सुनील चव्हाण व सर्व शिक्षक काशीनाथ डाखोरे,पुष्पा सिहोतीय,कीर्ती कुरील, राधिका ठोके,सिपाही योगिता फाटले व अरुणा पवार यांनी परिश्रम घेतले.