आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ शाखा उद्घाटन सोहळा संपन्न

49

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8जानेवारी):- तालुक्यातील पोखर्णी येथे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे (काका)मित्रमंडळाच्या शाखेच्या फलकाचे उदघाटन डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रासपा चे जिल्हाध्यक्ष संदिप आळनुरे ,मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे,शिवाजी निरदुडे,हनुमं मुंडे,राजेभाउ सातपुते,शंभूदेव मुंडे, श्रीमंत नागरगोजे यांची उपस्थिती होती. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळ सातत्याने कार्यरत आहे.

त्यामुळे गावोगावी शाखा स्थापन करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. त्याच उत्साहातून गंगाखेड तालुक्यातील मौजे.पोखर्णी (वा) येथे गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाजत-गाजत व फटाक्यांचीअतिषबाजी करत ग्रामस्थांनी आ.डॉ.गुट्टे यांचे स्वागत केले.

कार्यक्रमास शिवाजी वाळके, रत्नाकर पिंपरे, गंगाधर वाळके, बबन वाळके, शाखा अध्यक्ष तुकाराम वाळके, उपाध्यक्ष राजेंद्र पंडित, सचिव पांडूरंग परकड, कोषाध्यक्ष शिवलिंग देवकते, संघटक मोहन मुळे, सदस्य धनु वाळके, दत्तराव परकड, भरत गोपनर, दिपक वाळके, नितीन पंडित, शेटीबा परकड, परमेश्वर वाळके यांच्या सह ग्रामस्थ, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते