नेपाळ येथे सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन

188

🔹यवतमाळ जिल्ह्यातील सहा साहित्यिकांचा समावेश
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.7जानेवारी):-मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार देशासह परदेशातही व्हावा या हेतूने 13 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान नेपाळ येथे शब्द सातवे मराठी विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले . असून या साहित्य संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातील सहा साहित्यिकांचा समावेश करण्यात आला आहे .मागील सहा वर्षांपासून मराठी साहित्याचा झेंडा शब्द विश्व साहित्य संमेलनाचे प्रमुख चित्रपट निर्माते संजय सिंगलवार यांनी रोवला असून आतापर्यंत बँकॉक, दुबई ,मलेशिया ,इंडोनेशिया , श्रीलंका ,मालदीव , या देशात शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेआहे.या संमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण साहित्यिकांची मांदियाळी उपस्थित असणारआहे.

यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील ऑल राऊंडर ,हरहुन्नरी व्यक्तीमत्व तथा कृषिभूषण दीपकभाऊ आसेगांवकर ,विजया आसेगावकर तर यवतमाळचे प्रसिद्ध गझलकार तथा श्रीलंका येथील पाचव्या विश्व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.सिद्धार्थ भगत , कवियत्री नयना सोलंकी तथा उमरखेडचे गेयकवी तथा प्रबोधनकार प्रा.डॉ. अनिल काळबांडे ,कवियत्री प्रा.ज्योती काळबांडे यांचा सहभाग असणार आहे.दिनांक 13 ते 17 जानेवारी दरम्यान नेपाळ येथे होणाऱ्या या संमेलनात पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कवी संमेलन , गझल मुशायरा , शोधनिबंध वाचन, गटचर्चा ,’सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचा सहभाग राहणार आहे .

भारत नेपाळ सांस्कृतिक . अनुबंध या विषयावर आधारित या संमेलनाचे अध्यक्ष दगडू लोमटे आंबेजोगाई तर उद्घाटन चंद्रलेखा बेलसरे पुणे यांच्या हस्ते होणार आहे . या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी कुठल्याही प्रकारचे शासनाकडून अनुदान न घेता साहित्यिक आपल्या स्वखर्चाने हे साहित्य संमेलन यशस्वी करतात .यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यिक ग्रामीण मराठी साहित्याला साता समुद्रापार पोहोचवण्यासाठी यात सहभागी झाले आहेत .सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे .