लक्ष्मण खोब्रागडे यांना उत्कृष्ट झाडीबोली साहित्य निर्मिती पुरस्कार प्रदान

62

✒️मुल(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुल(दि.8जानेवारी):- झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने उत्कृष्ट साहित्य निर्मिती तसेच एका झाडीपट्टी लोककलावंतास पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी इच्छूक साहित्यिकांना व लोककलावंताना मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. या आलेल्या प्रवेशिका मधून निवड समितीने विजेत्यांची निवड केली आहे .

उत्कृष्ट झाडीबोली साहित्य निर्मितीसाठी जुनासुर्लाचे लक्ष्मण खोब्रागडे यांच्या ‘मोरगाड’ या संग्रहाची निवड करण्यात आली होती.०८ जानेवारी२०२३ ला झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली येथे संपन्न झालेल्या विदर्भस्तरीय खुल्या कवीसंमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरणाला बँकेचे अध्यक्ष संचित सावकार पोरेड्डीवार व आमदार देवराव होळी ,ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे व विदर्भातील नामवंत साहित्यिक उपस्थित होते .

लक्ष्मण खोब्रागडे यांचे मोरगाड व लिपन हे दोन झाडीबोलीतील काव्यसंग्रह तसेच यश खेचून आणू दारी हा ललितलेखसंग्रह प्रकाशित आहे . त्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ व रोख १०००/-रुपये देऊन सत्कार करण्यात आला.पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण झगडकर , प्रा. विनायक धानोरकर, प्रसिद्ध गायक पुरूषोत्तम ठाकरे, उपेंद्र रोहणकर, संजीव बोरकर, सौ. लेनगुरे , सुनील पोटे, सुनील बावणे , प्रशांत भंडारे , शीतल कर्नेवार , विलास निंबोरकर , सविता झाडे , संतोष उईके यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .हे उपस्थित होते.