बँक लॉकरच्या नियमामध्ये महत्त्वाचे बदल

35

✒️नागेश खूपसे(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी)

प्रत्येक बँक खाते धारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे , भारतीय रिझर्व्ह बँकेने लॉकर सुविधेच्या नियमांत काही बदल केले आहेत.

*नव्या नियमांनुसार* – अगोदरच लॉकर असलेल्या ग्राहकांना आपल्या लॉकर अ‍ॅग्रीमेंटचे नुतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवर संदेश पाठवण्यात येत आहेत.
*ग्राहकांना गोपनीयता मिळणार नाही.आता लॉकरमध्ये काय-काय ठेवले जाणार आहे, याचा तपशील ग्राहकांना बँकेला द्यावा लागणार आहे. ग्राहकांना लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाची यादीच द्यावी लागणार आहे.

*लॉकर अ‍ॅग्रीमेंट म्हणजे काय ?*
बँक आणि ग्राहक यांच्यात करार केला जातो. यावर बँक अधिकारी आणि ग्राहक अशा दोघांचीही स्वाक्षरी असते.कराराची एक प्रत ग्राहकांना दिली जाते. तर एक प्रत बँकेकडे असते. या करारात बँकेवर कोणती जबाबदारी असेल, याचा तपशील दिलेला असतो.

करार करताना ग्राहकांनी एका वर्षात आपल्या लॉकरचा कमीत-कमी एकदातरी उपयोग करावा, असे सांगितले जाते.
दरम्यान, लॉकरमधील सामानाचे नुकसान झाल्यानंतर बँकेला ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी लागते.