साड्याऐवजी पुस्तकं खरेदीसाठी महिलांची गर्दी व्हावी : डॉ.अभिलाषा गावतुरे

40

✒️मूल(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुल(दि.10जानेवारी):-सावित्रीबाई चा विचार आज जगभर पसरला आहे. जगातल्या स्त्रीयांचाही आदर्श आज सावित्रीच आहे . भारतासारख्या रुढीवादी देशात व्यवस्थेला ठोकरुन आपल्या जीवाची,चारित्र्याची पर्वा न करता प्रवाहाच्या विरूद्ध दंड थोपटून तिने समग्र महिला जातीला जो आदर्श दिला.

त्याला इतिहासात तोड नाही.सावित्रीचे सामाजिक शैक्षणिक असे अनंत उपकार आपल्या भारतीय महिलांवर असल्याने नवीन साडीच्या दुकानात साडी खरेदी करण्यासाठी महिला ज्याप्रमाणे गर्दी करतात त्याप्रमाणेच एखाद्या पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं खरेदीसाठी महिला ज्या दिवशी गर्दी करतील तो दिवसच सावित्रीला खऱ्या अर्थाने अभिवादनाचा दिवस असेल असे घणाघाती प्रतिपादन चंद्रपूरच्या प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व सामाजिक चिंतक डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महिला शाखा मुल सावली च्या वतीने बबिता बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली कन्नमवार सभागृह मुल येथेआयोजित राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती समारोहातील दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बबिता बोबडे यांनी महिलांच्या प्रगतीत सावित्रीचे योगदान पिढीदरपिढी राहील त्यांच्या उपकरातून याजन्मी तरी उतराई नाहीच तिच्या क्रांतीतून जी क्रांतीबीजे निर्माण होत आहेत ती क्रांतिबीजे सावित्रीच्या कार्याला अवश्य न्याय देतील असे म्हणत त्यांनी स्वतः रचनाबद्द केलेली ‘सावित्री तू ना होती तो…’ ही हिंदीतील कविता सादर करून सावित्रीच्या कार्याला अभिवादन केले.कार्यक्रमाचे पहिले सत्र महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महिला शाखा मुल सावली च्या अध्यक्ष विद्या कोसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्यात विद्यार्थी व महिलांच्या विविध स्पर्धा, फ़ॅन्सी ड्रेस,पोवाडे,एकपात्री प्रयोग व प्रसिद्ध लेखक लक्ष्मण खोब्रागडे लिखित ‘जोखड’ ही दर्जेदार एकांकिका महिलांकडून सादर करण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रत्नमाला भोयर ,कल्पना खोब्रागडे ,वैशाली पेंढारकर,रत्नमाला गेडाम,कल्पना पेंदोर,सुवार्ता जीवणे,संगीता निमसरकार,गीता साखरे, विद्या कुमरे,देवांगी सुरपाम उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन चंदा तुरे तर आभारप्रदर्शन ज्योती निमगडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील निमगडे, डॅनिअल देवगडे,संतोष सिडाम,किशोर लाडे,उत्तम गोवर्धन यांनी सहकार्य केले.