नागभीड तालुका  पत्रकार संघ व्दारे बाळशास्त्री जांभेकर यांची २११ वी जयंती साजरी

24

✒️टेकरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

इरव्हा(टेकरी)(दि.10जानेवारी): –  मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांची २११ वी जयंती नागभीड तालुका पत्रकार संघ नोदंणी क्रमांक 9519महा461 (05) व्दारे  बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला.  

      यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  मा श्यामजी पाथोडे, पत्रकार संघाचे मार्गदर्शक जेष्ट पत्रकार आर,डी, रामटेके  ,प्रा, मनोहर मेञाम,सचिव अरुण भोले, सहसचिव दिवाकर सोनकुसरे, कोषाध्यक्ष यशवंत निकूरे, सदस्य,संजय बागडे, अशोक कोसे, पराग भानारकर ,सुरेश कोसे, आनंद मेञाम, वनराज शामकुळे,तानाजी अमृतकर,अमोल खडसे, आदीच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार, पुष्प अर्पण व अभिवादन  करण्यात आले.

हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असो परंतु पहाटे सकाळी पासुन दैनिक वृत्तपत्र वाचकाना घरोघरी पोहचविण्याचे महत्वाचे काम करून पत्रकारांच्या बातम्याना खरा न्याय देण्याचे कार्य करित असल्याने पत्रकारासह वृत्तपत्र विक्रेता व वितरक वृत्रपत्राचे मौलिक कार्य करित असतात” असे गौरव उदगाराने आपल्या मार्गदर्शनात जेष्ट पत्रकार आर,डी , रामटेके,   श्यामजी पाथोडे यांनी केले,. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशवंत निकूरे हयानी तर आभार प्रदर्शन अरुण भोले, हयानी  मानले,