सत्यशोधक फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरात भारतातील पहिली ऐतिहासिक रॅली संपन्न!…

92

🔸सत्यशोधक विचारमंचच्या वतीने धरणगाव शहरात रक्त तपासणी शिबिर प्रबोधन रॅली उत्साहात!….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.10जानेवारी):- सत्यशोधक विचार मंच धरणगाव च्या वतीने ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, ९ जानेवारी फातिमाबी शेख व १२ जानेवारी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती चे औचित्य साधून धरणगाव शहरात रक्त तपासणी शिबीर आणि ऐतिहासिक प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

फातिमाबी शेख यांच्या जयंती निमित्ताने धरणगाव शहरात रक्तदान शिबिर व प्रबोधन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल, इंदिरा गांधी विद्यालय, पी आर हायस्कूल, गुड शेफर्ड अकॅडमी, अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेतील मुला – मुलींनी, शिक्षक बंधू-भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी महापुरूषांचा व महामातांचा जयघोष केला.सकाळी पाताल नगरी येथे ११ ते २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय येथील डॉ.शिंपी सर व संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनाने रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले यामध्ये जवळ – जवळ ३० लोकांनी रक्ताच्या तपासण्या केल्या. यानंतर दुपारी ३:३० वाजता राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले स्मारक धरणी चौक येथून प्रबोधन रॅलीची सुरुवात करण्यात आली. महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील ८ वी च्या विद्यार्थिनींनी महामातांची वेशभूषा साकारली होती.

तेथून पुढे कोट बाजार येथे लालबहादूर शास्त्री स्मारक, बेलदार मोहल्ला मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवराय स्मारक या सर्व महापुरुषांना शाळेतील महिला शिक्षकांच्या व वेशभूषा साकारलेल्या मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले व रॅलीचा समारोप पी.आर. हायस्कूल येथे करण्यात आला.

या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प.रा.विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा कन्या विद्यालयाचे मुख्या.ए.एस.पाटील, महात्मा फुले हायस्कूल चे मुख्या.जे.एस.पवार, अँग्लो उर्दू हायस्कूल चे मुख्या. शकील शेख सर, गुड शेपर्ड च्या मुख्या.नाजनिन शेख, ग्रामीण रुग्णालयाचे समन्वयक ज्ञानेश्वर शिंपी, फॉरेन्सिक युनिट जळगावचे योगेश वराडे, जेष्ठ शिक्षिका डॉ.ए.सी.शिरसाठ, पी.आर.सोनवणे, आर.यु.पाटील, आसमा शेख, उपस्थित होते.

विचार मंचावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्याराणी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई व फातिमाबी शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर ज्येष्ठ शिक्षिका डॉ.ए.सी.शिरसाठ, पी.आर. सोनवणे, आर.यु.पाटील, आसमा शेख, नाजनीन शेख यांना सत्यशोधक विचारमंचच्या वतीने साडी व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.

यानंतर प.रा. विद्यालयाच्या वतीने आदर्श शिक्षक पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील, आबासाहेब राजेंद्र वाघ, वसीम सर यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर गुड शेपर्ड स्कुलच्या मुख्या. नाजनिन शेख यांनी फातिमाबी शेख व बहुजन महामातांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजीव कुमार सोनवणे यांनी या ऐतिहासिक रॅलीचे प्रशंसा केली.

मुलांना महापुरुष व महामातांच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे सचिव सी.के.पाटील सर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गिरीश चौधरी, डी.जी.शिंपी, राजेश्वर काकडे, अतुल पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. या ऐतिहासिक रॅलीच्या यशस्वीतेसाठी आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, एच.डी.माळी, पी.डी.पाटील, गोरख देशमुख, निलेश पवार, नगर मोमीन, हसन मोमीन, मयूर भामरे, प्रवीण मोरे, मधुकर सिताराम माळी, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, प्रफुल पवार या सर्व सत्यशोधक विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशनच्या वतीने अल्पोहार देण्यात आला.या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील यांनी आभार प्रदर्शन एच.डी.माळी यांनी मानले.