ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

47

🔹राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या जननी- विवेक बोढे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.12जानेवारी):- येथील ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गुरुवार 12 जानेवारीला हिंदवी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

यावेळी बोलतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पराक्रम, संघटन कौशल्य, अश्या गुणांचे बाळकडू दिले तसेच स्वराज्य स्थापनेचे, राजकारणाचे धडे दिले. राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या जननी होत्या.युवकांमध्ये सकारात्मकतेची ऊर्जा जागृत केली तर युवक आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतात असा विश्वास स्वामीजींचा होता. स्वामी विवेकानंद यांची आज जयंती हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, समाजिक कार्यकर्त्या सरस्वती पाटील, भाजपाचे राजेंद्र लुटे, श्रीकांत बहादूर, सुनंदा लिहितकर, प्रीती धोटे, लता आवारी, शमीम बानो, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, भारती परते, स्नेहा कुम्मरवार उपस्थित होते.