पुसेगावात अद्ययावत ग्रंथालयाची उभारणी होणार

32

🔹बाळासाहेब जाधव : सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि शासनाचा पुढाकार

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

सातारा(दि.12जानेवारी):-श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि शासनाच्या माध्यमातून एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुसेगावात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुसज्ज ग्रंथालय लवकरच उभे करणार आहे. या आधुनिक वाचनालयाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी केले.पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयातील इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव करताना बाळासाहेब जाधव, , ट्रस्टचे विश्वस्त सचिन देशमुख, स्कुल कमिटी सदस्य मोहन जाधव, मान्यवर उपस्थित होते.

जाधव म्हणाले, खटाव तालुक्याला अधिकाऱ्यांची परंपरा लाभली आहे. येथील विद्यार्थी आयएएस, आयपीएस बनले पाहिजेत. यासाठी पुसेगावसह परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यपुसेगाव येथे सुसज्ज असे आधुनिक वाचनालय उभे करणार आहे. शासनाकडून त्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टकडून जागा उपलब्ध करुन देण्याबरोबरच लागेल ती मदत केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मातीतूनच आयएएस, आयपीएस अधिकारी घडण्यास मदत होईल.

कार्यक्रमात इयत्ता आठव शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात ५वे स्थान मिळवणाऱ्या सानिका नागनाथ देशमुख आणि राज्य गुणवत्ता यादीत १३ वे स्थान मिळवणाऱ्या वेदांत मनोज जगदाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या इयत्ता आठवीतील १३‍ आणि पाचवीतील तीन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांन मुख्याध्यापक बी. डी. जाधव शिक्षिका मनीषा कर्णे, योगिता जगता यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक बाबासाहेब जाधव यांनी केले. सूत्रसंचलन आर व्ही गोरे यांनी केले.