क्रांतिसिंह नाना पाटील वाचनालयात जिजाऊ जयंती साजरी

107

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.12जानेवारी):-घिसापुरी येथील क्रांतिसिंह नाना पाटील सार्व.वाचनालयात राजमाता ,राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी घोसापुरी येथील नवनिर्वाचित सरपंच फारुख शेख, उपसरपंच सुभाष जाधव, विजय दादा पोकळे, भागवत वैद्य (पत्रकार),वैभव पोकळे उपस्थित होते.यावेळी भागवत वैद्य म्हणाले की,राजमाता, राष्ट्रमाता, जिजामाता यांची कर्तपगारी सर्वात महत्वाची होती.

त्यांनी आपल्या मुलाला राजा कसा असावा याचे पूर्ण शिक्षण देऊन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना बनविले. प्रतेक आई बाबा यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन चांगला अधिकारी बनावे.तसेच नाही काहीं बनविता अले.तर किमान एक जागरूक नागरिक म्हणून तरी त्याला बनावे. आज ची पिढी ही व्यसनाधीन होत आहे.याकडे आई बाबा यांचे लक्ष असेल पाहिजे.यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय दादा पोकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव पोकळे यांनी मानले.