प्रेयसीला बोलण्याच्या कारणावरून चाकूने हल्ला.

36

🔺फिर्यादी गंभीर आरोपीस अटक

✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागभीड (दि. 12 जानेवारी):–नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वासाला मेंढा येथील रुपेश रवी सिडाम वय 20 वर्ष हा गावाजवळील मिडांळा येथे नाटक पाहण्याकरिता गेला असता आरोपी मयूर दानी वय 21वर्ष खेड मक्ता तह. ब्रम्हपुरी यांने फोनवरून शिवीगाळ करत कोदेपार रोडवर बोलविले असता आरोपीने तू माझ्या प्रेयसी सोबत का बरं बोलतो असे म्हणून आरोपीने जवळ असलेल्या धारधार चाकूने फिर्यादी च्या पोटावर व छातीवर वार करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यावरून अप क्रमांक 14/2023,कलम 307/भा, द, वी सह कलम 3,2, 4 अनु जाती, जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.