नामांतराच्या लढ्यातील शहीद भीम वीरांना दिली मानवंदना

36

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15जानेवारी):- येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दि. १४ जानेवारी २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा करण्यात आला. तसेच नामांतर लढ्यात शहीद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे ,(रिपाई) शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण केला .

यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पुसद तालुकाध्यक्ष समाधान केवटे, उपाध्यक्ष दिनेश खांडेकर, अमोल सुर्यतळ, पवन गंगाळे, प्रीतम आळणे, राहुल झिंजारे, सागर लोखंडे, शरद कांबळे तसेच इत्यादी समाज बाधंव उपस्थित होता