पालक मेळावा व स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

67

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 15 जानेवारी):-दि.11 जानेवारी 2023 रोज बुधवारला अनुदानीत प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा, एकारा येथे पालक मेळावा व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या कार्यक्रमाचे उद्दघाटक म्हणून श्री.संजयजी गजपुरे (माजी जि.प.सदस्य चंद्रपूर), तर अध्यक्ष म्हणून श्री.अतुलजी देशकर (माजी आमदार, ब्रम्हपुरी विधानसभा) यांनी स्थान भूषविले. सह-उद्दघाटक म्हणून डॉ.बालपांडे साहेब (अध्यक्ष -निरूपा शिक्षण संस्था, रुई), श्री.प्रेमलाल धोटे साहेब (कंत्राटदार), विशेष मार्गदर्शक म्हणून डॉ.शिंगाडे सर (प्राचार्य -शासकीय तंत्रनिकेतन, ब्रम्हपुरी), श्री. लक्ष्मन मेश्राम सर (संचालक – इन्स्पायर करियर अकादमी, ब्रम्हपुरी), प्रमुख अतिथी म्हणून श्री.प्रधान बाबूसाहेब (सदस्य-निरूपा शिक्षण संस्था, रुई), डॉ.कळसक साहेब (सहसचिव-निरूपा शिक्षण संस्था, रुई), श्री.रमेशजी भैसारे (सरपंच ग्रा.पं. एकारा), श्री.हरिशचंद्र गेडाम (उपसरपंच ग्रा.पं.एकारा), श्री.बावनकर सर (मुख्याध्यापक, जि.प.शाळा,एकारा), कुमारी.सुजाता येलाम मॅडम (सरपंच ग्रा.पं. पातागुड्डम), सौ.सुरेखा बालपांडे मॅडम (उपाध्यक्ष ग्रा.बी.शे.पतसंस्था, ब्रम्हपुरी), श्री.पंकज बालपांडे साहेब (बी-मार्ट संचालक, ब्रम्हपुरी), डॉ.सालोटकर सर, इत्यादी पाहुणे उपस्तिथ होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून माँ.सरस्वती, राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ह्या सर्वांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्दघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सुंदरश्या समूहगीताने आणि पुष्पगुच्छ देत करण्यात आले. तसेच आश्रम शाळेतील माजी विद्यार्थी कु.अक्षय भैसारे (मॅनेजर -विदर्भ ग्रामीण कोकण बँक गांगलवाडी), कुमारी.मयुरी गजबे, कु. जितेंद्र आलाम (आय.टी.आय.शिक्षक), कु. हेमराज हनवते, कु.ऋषी सावसाकडे, कुमारी.विश्रांती हलामे, कु.आशिक राऊत ह्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देत गौरविण्यात आले. सोबतच सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती.लोणकर मॅडम (माध्यमिक मुख्याध्यापिका) यांनी केले. तर आभार श्री.टी.पी.प्रधान सर (प्राथमिक मुख्याध्यापक) यांनी मानले. सदर कार्यक्रमाला आलेल्या सर्व मार्गदर्शकांनी उपस्थित विध्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विशेष मोलाचे मार्गदर्शन केले.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, ह्यासाठी सायंकाळी 7:30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे उद्दघाटक म्हणून श्री.रमेशजी भैसारे (सरपंच, ग्रा.पं.एकारा), तसेच अध्यक्ष म्हणून डॉ.बालपांडे साहेब (अध्यक्ष-निरूपा शिक्षण संस्था रुई), प्रमुख पाहुणे म्हणून श्री.कावळे साहेब (सहाय्यक अधिकारी-ए.आ.प्र.कार्यालय चिमूर), सामाजिक कार्यकर्ते श्री.उदयकुमार पगाडे, श्री.भूषण आंबोरकर, कुमारी.पूनम कुथे, श्री.पठान सर, इत्यादी लोकांची उपस्तिथी होती. सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने सहभागी होत, विविध प्रकारचे नृत्य, एकपात्री नाटक, समूह गीत, इत्यादी गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चौधरी सर आणि श्री.बावणे सर यांनी केले, तर आभार श्री.डांगे सर यांनी मानले.