महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापराक्रमी वीर योद्ध्याला अभिवादन !…

37

🔹मेवाडरत्न महाराणा प्रताप यांचे जीवन कार्य प्रेरणादायी – मा. एम बी मोरे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.20जानेवारी):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारताचे वीर सुपुत्र मेवाडरत्न महाराणा प्रताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी केले.

शाळेचे पर्यवेक्षक एम बी मोरे यांच्या शुभहस्ते भारताचे वीर सुपुत्र, उदयपूरचे राजे, मेवाड़रत्न, आदर्श राजा, महामानव, वीर सम्राट, शूरवीर, महापराक्रमी, साहसी अजिंक्य योद्धा, वीर शिरोमणी क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे, सी एम भोळे, एच डी माळी, एस व्ही आढावे, एस एन कोळी, व्ही टी माळी, पी डी पाटील, श्रीमती व्ही पी वऱ्हाडे, एम जे महाजन, लिपिक पी डी बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, सेवक अशोक पाटील उपस्थित होते.