भगवतीदेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पैनगंगेस ‘क्षेत्रभेट’ तथा अभ्यास दौरा

34

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.20जानेवारी):-रोज गुरुवारला भगवतीदेवी विद्यालय, देवसरी ता. उमरखेड येथील सर्व विद्यार्थी क्षेत्रभेटीसाठी देवसरी येथून बारा वाजता जवळच असलेल्या विदर्भ-मराठवाडा सीमा असलेल्या पैनगंगा नदीला क्षेत्र भेट देण्यात आली. विद्यालयातून प्रथमच सर्व विद्यार्थ्यांचे पायी पायी गमन झाले. त्यादरम्यान देवसरी व परिसराचे ग्रामदैवत माता भगवतीचे दर्शन घेण्यात आले. व पैनगंगा नदीच्या तीरावर सर्वजण पोहोचले. तिथे सर्व विद्यार्थ्यांनी रेतीचे नमुने शंक शिंपले पाण्यातील सजीव मासे शेवाळ पर्यावरण संस्था वनस्पती पक्षी यांचे जवळून निरीक्षण करण्यात आले. यावेळेस विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून फोटोग्राफी करण्यात आली.

यावेळेस विद्यार्थी वर्ग अतिशय उत्साहात होते. याच वेळेस विज्ञान विषयाचे शिक्षक तथा विद्यालयाचे कुशल मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे नदीच्या पात्रात उत्तम असे पर्यावरण संस्था जैविक संस्था रेतीचे महत्व जलचर प्राण्याविषयी माहिती पैनगंगा नदीच्या उगमस्थान बद्दल अतिशय सखोल पणे विद्यार्थ्यांना देण्यात आली. क्षेत्रभेट हा उपक्रम भूगोल विज्ञान या विषयात शिकवला जातो. या क्षेत्रभेटीचा भावी जीवनात विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार. असे मार्गदर्शन करण्यात आले.नदीच्या पात्रामध्ये सर्वांनी सामूहिक भोजनाचा आनंद घेण्यात आला. व तेथून प्रस्थान दिघडी येथील नदी किनाऱ्यावर असलेले महादेवाचे मंदिरात सर्वांनी दर्शन घेतले व दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिघडी येथील जुनेगाव येथील मसाई माता या ठिकाणी यात्रा महोत्सव चालू आहे.

त्या ठिकाणी जाऊन दर्शन तथा यात्रेचा आनंद घेतला व त्या ठिकाणी दिघडी येथील ग्रामस्थांकडून प्रसादरुपी गरमागरम वरण-भात भोजनाचा आनंद घेतला. तेथून सर्व विद्यार्थी कर्मचारी निसर्गपर्यटन करत करत विद्यालयात पावणे पाच वाजता परतीचा प्रवास केला. हा पूर्ण प्रवास विद्यार्थी तथा कर्मचाऱ्यांनी पायी पायी केला. अंदाजे 12 ते 13 किलोमीटरचा प्रवास झाला असावा यावेळेस विद्यालयातील कर्मचारी दिनेश वानरे दिगंबर माने शेख सत्तार गणेशराव शिंदे अनिल अल्लडवार भागवत कबले सौ. मीनाताई कदम पांडुरंग शिरफुले अरविंद चेपुरवार भागवत जाधव व विशेष म्हणजे दिघडी येथील पालक सज्जनराव राणे यांनी या प्रवासादरम्यान विशेष सहकार्य केले. त्यामुळे प्रवास अचूक झाला. विशेषता विद्यालयातील प्रथमच शैक्षणिक सहल तथा क्षेत्र भेटीचा अनुभव व यात्रेचा आनंद पदयात्रेचा लाभ विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना घेण्यात आला. जणू काही ही एक एकदिवसीय निसर्ग शाळाच होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसांडून वाहत होता. हे विसरता येणार नाही.