तरुणांनी सुज्ञ मतदार बनण्याची गरज-प्रा डॉ रामेश्वर होंडकर

170

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.20जानेवारी):-राजकीय व्यवस्थेत विकासात्मक दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपले प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती निवडण्याकरिता महाविद्यालयीन तरुणांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंद करणे महत्त्वाचे आहे. ही नोंद फॉर्म नंबर सहा भरून ऑनलाईन तसेच ऑफलाईन करता येते. याकरिता एक ओळखपत्र पुरावा ज्यामध्ये आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन किंवा इतर कोणतेही ओळखपत्र व एक स्थायी निवास पत्ता पुरावा ज्यामध्ये लाईट बिल टेलीफोन बिल बँक पासबुक या प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात. या सह आपण आपले नाव मतदार यादी मध्ये नोंद करू शकता.

सुज्ञ विद्यार्थ्यांनी भविष्यकालीन विचार करून आपले मत खऱ्या अर्थाने दान करणे आवश्यक असते नवे की राजकीय व्यक्तींच्या आमिषांना बळी पडून आपले मत विकता कामा नये दान म्हणजे ज्या बाबी आपण निस्वार्थपणे देत असतो अशा सेवा वस्तू यांना आपण दान असे म्हणतो ज्या मोबदल्यात आपण काहीही घेत नसतो तसेच सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी मतदान सुद्धा केले पाहिजे.

मतदान करण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून कोणतेही अमिष न घेता योग्य व सुज्ञ आपला प्रतिनिधी निवडून देणे आवश्यक असते. जेणेकरून खऱ्या अर्थाने सर्व समावेशक विकास साधला जाऊ शकेल याकरिता या प्रक्रियेत येण्याकरिता सर्वप्रथम आपले मतदार यादीत नाव असणे अपेक्षित आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंद करून आपले एक कर्तव्य पूर्ण करावे व वेळोवेळी मतदान करून योग्य लोकप्रतिनिधीची निवड करावी असे मार्गदर्शन करताना डॉ रामेश्वर होंडकर यांनी मत व्यक्त केले.

कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे मतदार नाव नोंदणी व जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर सर होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा नरेश पाटील, डॉ. रामेश्वर व्हंडकर डॉ अशोक सातपुते विचारमंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नरेश वा. पाटील यांनी केले.