गुन्हा दाखल करण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश

184

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड :- गंगाखेड शहरातील महात्मा फुले नगर येथील राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यु झाल्याची घटना घडली. यात गळफास घेतल्याच्या खुणा न आढळल्याने विवाहितेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन मांडल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
गंगाखेड शहरातील महात्मा फुले नगर परिसरात राहत असलेल्या प्रतिक्षा विशाल हनवते वय वर्ष२२ हिने गळफास घेतला म्हणून सकाळी ९:२० वाजेच्या सुमारास पती विशाल हनवते याने गंगाखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य मुळे, परिचारिका वैशाली केंद्रे, उषा इधाटे, संगीता केंद्रे यांनी तिला तपासून मृत घोषित करत पोलीस ठाण्यात एमएलसी पाठविली तेंव्हा पोलीसांनी विवाहितेचा पती विशाल हनवते यास पोलीस ठाण्यात बसवून ठेवत दुपारी १२ वाजता सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगणवाड, बिट जमादार मारोती माहुरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वार्डात असलेला विवाहितेचा मृतदेह शवागृहात नेऊन पंचनामा केला.
शवविच्छदन केल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलीस डायरीतअकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची भूमिका पोलीसांनी घेतल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या मांडून खुनाचा गुन्हा दाखल करा नाहीतर दोषींना आमच्या ताब्यात द्या असे बोलल्याने पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी संतप्त झालेले नातेवाईक काही एक एकत नसल्याचे पाहून सायंकाळी ७:३० वाजता पोलीस ठाण्यात आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी नातेवाईकांची समजूत काढल्याने तणाव निवढला. ८:३० वाजेच्य सुमारास पोलीस ठाण्यात जमलेले नातेवाईक अंत्यविधीसाठी निघून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी आत्महत्यास प्रवत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यत सुरु होती. गंगाखेड पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने परभणी येथून तसेच पालम, पिंपळदरी, सोनपेठ पोलीस ठाण्यातील कुमक पोलीस ठाण्यात मागविण्यात आली होती. विवाहतेच्या गळ्यावर गळफास घेतल्याचे व्रण दिसत नसल्याने नातेवाईकानी खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी पतीसह सासर च्या मंडळीला ताब्यात घेतले आहे.