ऑलम्पिकवीर स्व.पै.खाशाबा जाधव पुरस्काराने दिव्यांग खेळाडूं सन्मानित

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.21जानेवारी):-जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय, सातारा आयोजित पै. खाशाबा जाधव यांच्या 97व्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये दिव्यांग खेळाडू कु.प्रणव पवार(मैदानी खेळ), कु.विक्रम शेंडगे(मैदानी खेळ), श्री.नवनाथ बिडगर(मैदानी खेळ),श्री.राजेंद्र पवार(मैदानी खेळ)खेळाडूंचा सत्कार .ग्रुप कॅप्टन कर्नल मा.श्री. उज्वल घोरपडे प्राचार्य सैनिक स्कूल, सातारा,मा. पै.शिवाजीराव पाचपुते( महाराष्ट्र केसरी),मा.चंद्रहार पाटील (डबल महाराष्ट्र केसरी),पै.असलम काझी (कुस्ती सम्राट),पै. संतोष वेताळ( हिंदकेसरी), मा.श्री रंजीत जाधव( खाशाबा जाधव यांचे सुपुत्र) व मा.श्री.युवराज नाईक(सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी), क्रीडा प्रशिक्षक माने सर,राजेंद्र पवार सर तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.