भारतीय विद्यार्थी मोर्चाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर ; प्रदेशाध्यक्ष पदी मा.ऍड.किरण कांबळे यांची निवड..!

98

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.23जानेवारी):- भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एक गैरराजनितिक व राष्ट्रव्यापी संघटन असुन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी निर्माण केलेले संघटन असुन भारतीय विद्यार्थी मोर्चाची स्थापना 11 एप्रिल 2011 रोजी सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आली असून भारतीय विद्यार्थी मोर्चा हे यावर्षी पासून 12 व्या वर्षात पदार्पण करत आहे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून बहुजन समाजातील निर्माण झालेल्या शिव फुले शाहू आंबेडकर या सर्व बहुजन महापुरुषांच अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करण्यासाठीच भारतीय विद्यार्थी मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे.

भारतीय विद्यार्थी मोर्चाचा मुख्य उद्देशच प्रत्येक जात सुमहामध्ये युवा नेतृत्व निर्माण करणे होय हाच आहे व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला विद्यार्थी घडवण्याच काम भारतीय विद्यार्थी मोर्चाकडुन राष्ट्रीय स्तरावर चालू आहे.

दि.22 जानेवारी 2023 रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चाची राज्यस्तरीय मिटिंग ठाणे येथे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी मान्यवर सिध्दांत मौर्या सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.व 2023 मधील नवीन वर्षाची नवीन राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीर नगरीचे व कोल्हापूर जिल्हयाचे युवा नेतृत्व मा.किरण कांबळे सर यांची भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच राज्य कार्याध्यक्ष पदी मुंबई उपनगर चे रोशन खिराडे सर यांची निवड झाली.

राज्य उपाध्यक्ष ऋषिकेश देवसरकर, गणेश मंदापुरे, राज्य महासचिव काॅलेज एवमं विश्वविद्यालय सचिन इंगोलेराज्य महासचिव प्रतिक भोसले, राज्य सचिव संघटक प्रथमेश ठोंबरे, संपर्क महासचिव सुमित शिंदे, चेतन आवडे,मोनु तुरकने, राज्य महासचिव व्यवस्थापन शुभम खोब्रागडे, राज्य महासचिव सोशल मिडिया स्वप्निल लांजेकर, राज्य कोषाध्यक्ष संदिप इंगोले, राज्य सदस्य शुभम बर्डे,सुमित दिवाणजी.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय प्रभारी सिध्दांत मौर्या सरांकडुन शुभेच्छा देण्यात आल्या.