गंगाखेड तालुका प्रवासी महासंघाच्या अध्यक्षपदी गोपाळ मंत्री

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23जानेवारी):- तालुका प्रवासी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ मंत्री यांची तर संघटक पदी सामाजिक कार्यकर्त्या सूर्यमाला मोतीपवळे यांची निवड केल्याचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष के. डी. वर्मा यांनी दिनांक 23 जानेवारी रोजी आयोजित बैठकीत दिले. या बैठकीमध्ये प्रवासी महासंघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यामध्ये सचिव अतुल तुपकर, कोषाध्यक्ष नंदकिशोर सोमानी, उपाध्यक्ष अनंत काळे, मकरंद चिनके, सहसंघटक विजय बेरळीकर, सहसचिव गणेश मेहता,सदस्य पद्मजा कुलकर्णी, आशाताई रेघाटे, संजय बचाटे, रमेश औसेकर, अनिल साळवे, सोपान टोले, निखिल वंजारे आदींची निवड करण्यात आली. दिनांक 28 जानेवारी रोजी रथसप्तमीनिमित्त प्रवासी दिन साजरा केला जातो यानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात चर्चा करण्यात आली.