उमरखेड येथे राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने मतदार जनजागृती रॅली

53

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 25 जानेवारी):-राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील एन.एस.एस व एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांसह शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

तहसील कार्यालय येथून सुरुवात करून, शहरातील माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते परत तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

ही रॅली मा. श्री. व्यंकट राठोड (उपविभागीय अधिकारी) मा. श्री. आनंद देऊळगावकर (तहसीलदार) मस्के साहेब, भूमी-अभिलेख रमेश विनकरे,सहाय्यक शिक्षक, व्ही. बी. बोदगिरे, प्रदीप सोयाम, एम.एस. तिडके यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.

रॅली झाल्यानंतर लगेच तहसील कार्यालयाच्या आवारात एक छोटा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमात रॅलीत सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली त्यात ‘चला कर्तव्यास जागूया, निर्भयपणे मतदान करूया’, ‘आमचा हक्क, आमचे मत, चला करूया समृद्ध लोकशाही’, ‘मतदान करूया मिळून सारे, बजावूया आपला अधिकार….’अशा विविध घोषवाक्यांतून उमरखेडमधील तरुण- तरुणींनी मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प केला. निमित्त होते.

युवा मतदार जागृती कार्यक्रमाचे मतदान जनजागृती रॅली काढण्यासाठी पाठबळ व शुभेच्छा व मार्गदर्शन यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर व सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांनी दिले.

या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालय रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पी.वाय.अनासने, महिला सहा कार्यक्रमाधिकारी प्रा.ए. पी.मिटके मॅडम, कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. शिवप्रसाद इंगळे,तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही. एस. इंगळे, एन.एस.एस व एन.सी.सीचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी , पत्रकार मुन्नारवार व इतर पत्रकार बंधू उपस्थित होते.