प्रजासत्ताकदिनी खडसंगीत थिरकणार तरुणाई

34

🔸प्रजासत्ताक दिनानिमित्त खडसंगी येथे खुली एकल न्रुत्य स्पर्धा

✒️सुयोग सुरेश डांगे(तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.25जानेवारी):-खडसंगी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था खडसंगी व चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमूर शाखा खडसंगीच्या वतीने खुली एकल न्रुत्य स्पर्धा बसस्टॉप जवळील बाजार वार्डातील परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे उधघाट्क जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी हे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमूर मिडीया फाऊंडेशन चिमूर चे अध्यक्ष पंकज मिश्रा हे आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्राजक्ता बुरांडे,शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम, चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभने, भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत, ग्रामपंचायत खडसंगीचे सरपंच प्रियंका कोलते, उपसरपंच संदीप भोस्कर, माजी पंचायत समिती सदस्य अजहर शेख, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत रणदिवे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. रविंद्र वाभिटकर, तलाठी वैभव कार्लेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक मत्ते, भिमज्योती संस्थेचे अध्यक्ष गौतम रामटेके, माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, वहानगावचे सरपंच प्रशांत कोल्हे, भिसीचे नाट्यकलाकार प्रा. आनंद भिमटे, अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे सारंग भिमटे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

एकल न्रुत्य स्पर्धा ही खडसंगी येथे दरवर्षी घेण्यात येते मात्र मागील तीन वर्षात देशासह शहरात व गावखेड्यात कोरोनाचे संकट आल्याने मुलामुलींना वर्क फ्रॉम होम असे ठेवण्यात आले होते त्यामुळं मुलामुलींच्या शारिरीक विकासाला खिंड पडली होती. व चालना मिळत नव्हती त्यामुळं मुलामुलींना एक व्यासपीठ निर्माण व्हाव त्यांचा शारिरीक विकास व्हावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश ठेऊन दरवर्षी खडसंगी येथील बाजार वार्डात बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था खडसंगी व चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमूर शाखा खडसंगी तर्फे दिनांक 26 जानेवारी 2023 गुरवार ला प्रजासत्ताक दिनी एकल न्रुत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या स्पर्धेत मुलामुलींनी भाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा अशी माहिती व स्पर्धकांनी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था, चिमूर प्रेस मीडिया फाउंडेशन व आयोजन समितीचे अध्यक्ष प्रमोद राऊत, सचिव आशिष गजभिये यांनी केले आहे.