लोकसहभागातून गावाचा विकास करावा – डॉ श्याम खंडारे संचालक, रासेयो गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि.25 जानेवारी):-राष्ट्रीय सेवा योजना हे माझ्यासाठी नाही तर तुमच्या साठी हे ब्रीद वाक्य आहे स्वतः सह समाजाच्या व गावाच्या उन्ननयकरिता समूहशक्तीतून गावाचा विकास घडवून आणावे केवळ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाकडून सर्व योजिलेले गाव विकासाचे प्रकल्प यशस्वीपणे राबवू शकत नाही. त्यासाठी गावाचा हातभार गावाचे सहकार्याची गरज आहे. तेव्हाच रणमोचन सारख्या गावात शासनाचे अनेक योजना राबवून गावाच्या विकासात हातभार लागू शकेल असे उद्गार उद्धघाटक म्हणून उपस्थित डॉ श्याम खंडारे यांनी केले. यावेळी विचारपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व ने. भै. हि. शिक्षण संस्था ब्रम्हपुरी चे उपाध्यक्ष अँड. प्रकाश भैया हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून संजय पुरी, गटविकास अधिकारी ब्रम्हपुरी, सरपंच सौ निलिमा राऊत , प्रा जि. एन केला सदस्य ने भै.हि संस्था, प्राचार्य डॉ डी एच गहाणे, प्राचार्य डॉ हर्षा कानफाडे, डॉ सुभाष शेकोकर, डॉ आर के डांगे, मेजर विनोद नरड, श्री सदाशिव ठाकरे उपसरपंच, दादाजी पिलारे, कु मनिषा महाकाळकर, रासेयो कार्यक्रमाधिकारी तथा विभागिय समन्वयक डॉ प्रकाश वट्टी,इ. मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहउद्घाटक म्हणून उपस्थित श्रीमती उषा चौधरी तहसिलदार ब्रम्हपुरी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा युवकांचा अँसिड असतो. त्यांनी आपल्या अँसिडचे उपयोग समाजासाठी उपयोगात आणावे.

मी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थीनी होती. मला राष्ट्रीय सेवा योजनेतून बरेच काही गोष्टी शिकता आले याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देवून पुस्तकासोबत मैत्री करावी. विद्यार्थ्यांनी प्रशासनात येवून देश करावे असे मौलिक विचार उषा चौधरी यांनी व्यक्त केले. तर मा संजय पुरी ,प्राचार्य डॉ डी एच गहाणे,प्रा जी एन केला सौ निलिमा राऊत, यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश भैया यांनी या सात दिवसीय शिबीरातून रचनात्मक व विधायक कार्य हाती घेवून यशस्वी करण्यासाठी परिश्रम घ्यावे असे मौलिक मार्गदर्शन केले.

या सात दिवसीय शिबीराचे उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन प्रा अभिमन्यू पवार यांनी केले तर, प्रास्ताविक डॉ प्रकाश वट्टी यांनी केले आणि आभार कु अस्मिता कोठेवार, यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ विवेक नागभिडकर, डॉ आशिष साखरकर, रासेयो स्वयंसेवक गोपाल करंबे, सुरज मेश्राम, अश्विनी राऊत, गणेश धंजूळे, रोहित सहारे सौरभ तलमले,रुचिता येलमुले,मयुरी ठेंगरी, कुणाल नैताम, आदित्य राहुड, सचिन ठेंगरे, राणी गेटकर, प्राजक्ता विखार, पायल भर्रे, नंदिनी प्रधान , व सर्व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.