गेवराई येथील अट्टल महाविद्यालयास ‘नॅक’चा ‘A++’ ग्रेड

30

🔸ग्रेड कळताच महाविद्यालयात जल्लोष; ग्रामीण भागातून उच्च श्रेणी प्राप्त करणारे र.भ.अट्टल महाविद्यालय राज्यात प्रथम

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.25जानेवारी):-मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र.भ.अट्टल महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेच्या (नॅक) तज्ज्ञ समितीने २० व २१ जानेवारी रोजी भेट देत पाहणी केली होती.या पाहणीनंतर ‘नॅक’ने नुकतेच गुणांकन जाहीर केले असून त्यात र.भ.अट्टल महाविद्यालयास ‘A++’ ग्रेडसह ३.५३ गुण मिळाले आहे. चतुर्थ ‘सायकल’मध्ये ग्रामीण भागातून ही उच्च श्रेणी प्राप्त करणारे र.भ.अट्टल महाविद्यालय राज्यातील प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय ठरले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमरसिंह पंडित, प्राचार्य डॉ.रजनी शिखरे व महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्राचार्य प्रोफेसर रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने अतिशय ताकदीने तयारी करून २.७८ वरून ३.५३ पर्यंत मजल मारली आहे. आयक्यूएसी समन्वयक म्हणून डॉ. प्रवीण सोनुने यांनी संपूर्ण जबाबदारी पार पाडली.

नॅक मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणून दिल्ली येथील एसआरएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. पी. प्रकाश हे होते तर सदस्य म्हणून बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विद्यापीठ, लखनौ येथील प्रो. मनिषकुमार वर्मा आणि एमईएस महाविद्यालय, मरापल्ली, केरळ येथील प्राचार्य अजीम मोहम्मद यांनी काम पाहिले.या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळुंके, सरचिटणीस सतीश चव्हाण आणि केंद्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्यांसह अट्टल महाविद्यालय विकास समितीच्या सभासदांनी अभिनंदन केले आहे.