भौगोलिक परिस्थितीनुसार सर्व सजीवांची जडणघडण होत असते – डॉ. संदीप तडाखे

40

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.26जानेवारी):-पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व सजीवांची वनस्पतींची जडणघडण ही सभोवताली असलेल्या वातावरणानुसार होते. यासाठी भौगोलिक घटक खूपच महत्त्वाचे असतात. भूगोलशास्त्र विषयाच्या अभ्यासातून वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहेत या विषयाच्या अभ्यासातून जी.आय.एस,रिमोट सेन्सिंग जिओइन्फॉर्मेटिक्स,ट्रॅव्हल अँड टुरिझम इत्यादी सारखे कोर्सेस करून वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय क्षेत्रामध्ये नोकरी मिळवता येते व स्वयंरोजगार ही निर्माण करता येतो. असे प्रतिपादन बाळासाहेब देसाई कॉलेजचे भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप तडाखे यांनी भूगोलशास्त्र दिन साजरा करण्याच्या प्रसंगी प्रतिपादन केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्था विद्यानगर कराडच्या उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथील भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने आज दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी भूगोलशास्त्र दिन व आंतरराष्ट्रीय भरडधान्य फूड फेस्टिवल स्पर्धा, भौगोलिक उपकरणे व दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी भरडधान्य भरडधान्य व भूगोलशास्त्र दिन यावर विविध भितीपत्रिका तयार केल्या होत्या. आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉक्टर संदीप तडाखे भूगोलशास्त्र विभाग प्रमुख बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण हे होते.

तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव सर अध्यक्षस्थानी होते तसेच जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सर्व सरोदे मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमासाठी भूगोलशास्त्र विभागातील डॉ.एस. एम. चव्हाण मॅडम, श्रीमती एन. एस. देसाई. याप्रसंगी कुमारी अल्फिया मुल्ला व राखी सुतार या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. आंतरराष्ट्रीय भरडधान्य फूड फेस्टिवल स्पर्धेच्या निमित्ताने श्रीमती आर एस पाटील मॅडम व तसेच जिमखाना उपाध्यक्ष सौ सरोदे मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. विभागातील सर्व विद्यार्थी त्याचबरोबर जुनियर विभागातील श्री एस. एम. पांढरपट्टे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.