डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्थेत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27जानेवारी):-येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्थेत ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे यांच्या हस्ते .भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , विश्वरत्न , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले. त्या नंतर पतसंस्थेचे उपाध्यक्ष मा.बाबासाहेब वाघमारे यांच्या हस्ते , संचालक नारायण ठोके, टी. बी.कानींदे , माजी संचालक शिवशंकर घरडे सर, विलास मुक्कावर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीत गायनानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो च्या घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी पटसंस्थेचे सदस्य एन. आर. वाहुले, भाऊ कांबळे व लक्ष अभ्यासिका चे विद्मार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक यु.सी. पवार व वसुली अधिकारी शरद भगत यांनी परिश्रम घेतले.