समाज एकता अभियानांतर्गत शालेय साहीत्य वाटप

32

✒️अकोट(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अकोट(दि.29जानेवारी):- समाज एकता अभियानांतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्त समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जऊळका (वरूर) ता. अकोट येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

समाज एकता अभियान हे समाजातील दुर्लभ, शिक्षणापासून वंचित, व असंघटित समाजाला सर्वांगीण विकासासाठी प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे अभियान चालविताना सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून सुभाष लक्ष्मण बाळराज साहेब पोलीस उपनिरीक्षक औरंगाबाद यांच्या कडून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांना समाज एकता अभियानाचे नितेश धांडे सर याच्या वतीने मोफत शालेय साहित्य वापट करण्यात आले आहे. सदर उपक्रमामुळे दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना शाळेची आवड नक्की निर्माण होऊन शाळेत विद्यार्थांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल. असे मत शाळेचे मुख्याध्यापक मा. यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी गावच्या सरपंचा मा. सौ. उषा सतिश काठोळे, उपसरपंच दिपक शेटे केंद्र प्रमुख रामदास होपळ, मुख्याध्यापक मा. किशोर खराटे सर, शाळा शिक्षण समीतीचे अरुण सोनटक्के, वसंत शेटे, प्रविण अंभोरे, तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, धनंजय धा़डे, प्रकाश घनबहादूर, राजकुमार धारपवार, शेख अय्युब, सौ. कल्पना धांडे, कु निचळ, विभा चोपडे, राजे राठोड व अंगवाणवाडी सेविका उपस्थित होत्या.