सामाजिक कार्याबद्दल श्री दत्ता तोगरे व श्री रणवीर यांचा राजुरा येथे सत्कार

47

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.29जानेवारी):-:- तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी चळवळीतील प्रबोधनकर्ते श्री. दत्ता रानबा तोगरे -पाटागुडा आणि श्री रामदास रणवीर-मुकदामगुडा यांचा नुकताच राजुरा येथे सेवाकलश फॉउंडेशन तथा राजुरा क्लब राजुरा यांचे वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला.

श्री दत्ताजी तोगरे हे मागील 40 वर्षापासून समाजामध्ये फिरून व्यसनमुक्ती, अंधश्रधानिर्मूलन, सामाजिक सलोखा यासाठी काम करीत आहेत.अजूनही ते समाज कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच श्री रामदास रणवीर हे मागील वीस वर्षापासून महाराष्ट्र आंध्र सीमेवरील गावांचा लढा लढत असून सदर गावे महाराष्ट्रातच राहावीत यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रमासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री सुभाषभाऊ धोटे तसेच नगरपरिषद राजुरा चे नागराध्यक्ष श्री अरुणभाऊ धोटे आणि सेवाकलश फॉउंडेशन तथा राजुरा क्लब राजुरा चे पदाधिकारी उपस्थित होते.