पत्रकार व संपादक नितीन ढाकणे व दीपक गित्ते यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारणीवर निवड

31

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.31जानेवारी):-येथील निर्भीड पत्रकार संपादक व सामाजिक कार्यकर्ते नितीन ढाकणे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. व तरुण तडफदार पत्रकार दीपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नागपूर येथील बैठकीत ठराव घेऊन नुकतेच त्यांना देण्यात आले आहे. पत्रकार नितीन ढाकणे व दीपक गित्ते यांच्या निवडीचे पत्रकार जिल्ह्यातील माहिती अधिकार महासंघ अशा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

नागपूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या झालेल्या बैठकीत ठराव घेऊन बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी पत्रकार संपादक नितीन ढाकणे व पत्रकार दीपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे नियुक्तीपत्र दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी देण्यात आले आहे.मागील तीन वर्षापासून पत्रकार नितीन ढाकणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे परळी तालुका संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते. याचीच फलश्रुती म्हणून त्यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

आपल्या पत्रकारीते बरोबरच सामाजिक आणि आपल्या श्री वैद्यनाथ सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून नितीन ढाकणे व दिपक गित्ते हे सामाजिक कामात ही अग्रेसर असतात या आधी त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत, नितीन ढाकणे हे कवी सामाजिक अभ्यासक, पत्रकार संपादक ,लेखक ,उत्कृष्ट वक्ते म्हणूनही पंचक्रोशीत ओळखले जातात त्याच प्रमाणे दिपक गित्ते यांचेही सोबतीने प्रभावी कार्य दिसून येते हे दोघेही बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर व शेखर उर्फ चंद्रभान कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी पत्रकार नितीन ढाकणे व पत्रकार दीपक गित्ते यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे. या निवडीचे परळी शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवासह बीड जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.