बोधेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी देवदूत!

29

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.31जानेवारी):-आजकाल लोकांना फक्त सरकारी सेवा सुविधांमधील दोष शोधून नावे ठेवायला आवडते. नागरिक म्हणून आपण जागरूक असलो की व्यवस्था देखील व्यवस्थित काम करते. त्यामुळेच बन्नुभाई शेख व संगीता ताई ढवळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी करीत असलेले जनजागृतीचे काम देखील अतिशय महत्त्वाचे आहे.

आजकाल ग्रामीण भागासह शहरी भागात देखील विविध आजारावर ऊपचार करणारे आणेक खाजगी दवाखाने ऊदयास आल्याचे चित्र सर्वत्र पहान्यास मिळत असुन या खाजगी दवाखाना चालकात काही अपवाद वगळता माणुसकी नावाची मानसिकता हारवली की काय आसे चित्र बोधेगाव येथील खाजगी दवाखाने चालकांच्या वर्तणुकीतुन समोर येत आसल्याने रुग्णातुन संतापजनक प्रतिक्रिया व्येक्त केल्या जात असुन गेल्या काही दिवसापुर्वी रात्रीच्याक्षणी बोधेगावातील गरीब कुटुंब ऊपचारासाठी तीन तीन खाजगी दवाखान्याच्या ऊंबरवठ्या समोर व्याकुळ अवस्थेत डाक्टरांना आरोळ्या देत हाका मारीत असतांना रुग्णसेवा कडे दुर्लक्ष करत खाजगी डाक्टरांनी दवाखाना न ऊघडुन प्रतिसाद न दिल्याने जीवाची घालमेल झालेल्या रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागल्याची घटना समोर आली आसल्याने काही अपवाद वगळता बोधेगावातील खाजगी डाक्टर विषयी संतापजनक प्रतिक्रिया व्येक्त केल्या जात असुन आस्या वेळेस बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डाक्टर व कर्मचारी देवधुत ठरत असुन रात्री अपरात्री रुग्णसेवा करणारे बोधेगाव ग्रामीण रुग्णालयातील डाक्टर व कर्मचारी कवतुकास पात्र ठरत असुन गाव व परिसरातील रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ वाया न घालवता प्रथम ऊपचारासाठी बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात आधी धाव घ्यावी आसे आव्हान विविध सामाजिक पदाधिका-यांच्या वतीने करण्यात येत आहे.

बोधेगाव चे ग्रामीण रुग्णालय आहे दिवस रात्र 24 तास आपल्या सेवेत….वेळ 11वां.रात्रीची बोधेगाव येथील शफीक भाई शेख यांच्या पत्नीची तब्येत खराब होते.तेथून ते आपल्या पत्नीला मोटारसायकल वर बसवून गावातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेतात.दवाखाना बंद असतो.ते डॉक्टरांना फोन लावतात डॉक्टर फोन घेत नाही.बाहेरून आवाज देतात रिप्लाय येत नाही.दवाखान्याची बेल निरंतर वाजवतात रिप्लाय येत नाही.मग ते दुसऱ्या खाजगी दवाखान्याकडे पेशंट नेतात.फोन लावतात फोन बंद असतो.आवाज देतात,बेल वाजवली कोणताच रिप्लाय येत नाही.तिसऱ्या खाजगी दवाखान्यात जातात तेथेही हीच परिस्थिती चौथा,पाचवा,सर्व खाजगी दवाखान्याची प्रदक्षिणा घालतात.आपले पेशंट जास्त वेळ झाल्या मुळे अस्वस्थ होते.आपली जीवाची तगमग होते.वेळेत उपचार मिळाले नाही तर पेशंटचे काही बरेवाईट झाले तर ही काळजी वाटणे स्वाभाविक आहे. एक एक तास जर दवाखान्याचे डॉक्टर पाहण्यात जात असेल आणि तरी डॉक्टर उपलब्ध होत नसेल तर ….बोधेगाव शहरात याचा अनुभव अनेक जणांना आलेला आहे.

मागील काळात प्रत्येक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक रात्री महिन्याचे 30 दिवस रात्री वेळा पत्रकानुसार डॉक्टर सेवा देत होते.परंतु काही काळानंतर ही उपस्थिती कमी कमी होत गेली. व स्थानिक डॉक्टरांना कायमच रात्री सेवा द्यावी असा नियम झाला.त्यामुळे प्रत्येक वेळी आपण स्थानिक रहवासी असल्याने आपलेला सेवा द्यावी लागणार ह्या हेतूने ते आजही सेवा देतात त्यात दुमत नाही.परंतु काही एक दोन खाजगी दवाखाने सोडले तर रात्री कोणीही उठत नाही ही सत्य परिस्थिती आहे.हा झाला एक भाग..आपल्या साठी शासनाने 24 तास मोफत उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय बोधेगाव ला बांधले आहे.सर्व सुख सुविधा तेथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु आपल्या लक्षात ही गोष्ट लवकर येत नाही. रात्री सगळीकडे फिरून झाल्यावर त्यांनी (शफीक भाई) ग्रामीण रुग्णालय बोधेगाव येथे पेशंट नेले रात्रीचे 11वां.50मिनिटे झाली होती.

त्यांनी बाहेरून आवाज दिला डॉक्टर साहेब,पुढच्या क्षणाला आवाज आला गेट उघडेच आहे दरवाजा आत ढकला व आत पेशंटला आणा. वेळ पहाटे ३:५५ सचिन शेळके यांच्या आईला मुतखडा त्रास सुरू झाला रात्री १ वाजे पर्यंत सर्व खाजगी डॉक्टर यांना फोन करून कोणीच रिप्लाय दिला नाही त्रास वाढत होता शेवटी सचिन शेळके यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले पहाटे ३: ५५वां रुग्णालयात भरती केले.डॉक्टर योगेश गिरी,अधीपरीचारक अभिजित गर्जे,प्रयोग शाळा सहायक महेश धोंडे,कर्मचारी दहिफळे हजर असतात.पुढील ट्रीटमेंट अर्धा तास चालते पेशंट ला बरे वाटते. व ते घरी जातात…..

सांगायचे तात्पर्य….बोधेगाव येथे आपले ग्रामीण रुग्णालय दिवस रात्र 24तास आपल्या सेवेत उघडे असते.(बोधेगाव सह परिसरातील 36 गावा साठी)रात्री कोणीही आजारी पडले तर पहिले ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करा.खाजगी डॉक्टरांकडे रात्री वेळ वाया घालू नका…,(त्याला काही1,2, खाजगी दवाखाने अपवाद आहेत.)आपले हक्काचे रुग्णालय बोधेगाव ग्रामीण रुग्णालय…आपले ग्रामीण रुग्णालय शेवगाव नंतर दुसऱ्या नंबरचे रुग्णालय आहे.आपण त्याकडे लक्ष दिले तर सगळ्या सुविधा आपल्या गावात उपलब्ध आहेत मोफत.,..बन्नू भाई शेख वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष अहमदनगर दक्षिण संगीता ताई ढवळे,शेवगाव महिला तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी.