गोद्री कुंभ हा गोरबंजारा समाजाची संस्कृती नष्ट करण्याचा कुटील डाव-जय राठोड

83

✒️बळवंत़ मनवर(पुंसद प्रतिनिधी)

पुसद(दि.31जानेवारी):-तालुक्यातील व महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाची संस्कृती इ.स.पूर्व साडेपाच हजार वर्षे पूर्वीची असून आजही ती जगभरात बंजारा समाज बांधवांच्या तांड्यावर जशीच्या तशी कायम परिस्थीतीच आहे. मात्र अलीकडच्या काळात विविध प्रकारची अतिक्रमण या संस्कृतीवर होत.असून तिला मुळासकट समूळ नष्ट करण्याच्या कुटील डाव रचल्या जात असल्याचे मत गोरसेनेचे पुसद तालुका अध्यक्ष जय राठोड यांनी केले आहे गोर समाजाची संस्कृती पुरातन गोरशिकवाडी ची आदिम सिंधू कालीन परंपरा आहे. ती निसर्गपूजक आहे. माय बहिणींच्या मान सन्मानाकरिता आहे ती कुठल्याही प्रकारची अवडंमरे करीत नाही.

कुठलेही पाप पुण्य स्वर्ग नर्क मानत नाही. चोवीस योनी जन्मावर विश्वास ठेवत नाही. मात्र या समाजाची प्राचीन सभ्यता व रूढी परंपरा नष्ट करण्याची समाजातील काही राजकारणी साधुसंतांनी विविध प्रकारचे व्रत वैकल्याने लक्षचंडी विविध प्रकारचा कुंभमेळा घेऊन बंजारा समाजाची संस्कृती नष्ट करण्याच्या कारस्तानांचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे तरी गोर बंजारा समाज बांधवांनी हा कुटील डाव आणून पडावा.

यासाठी नवतरुण युवकांनी पुढाकार घेऊन समाजप्रबोधन करावे तसेच बंजारा समाज बांधवांची संस्कृती टिकून राहील ही काळजी काळाची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने बंजारा समाजाच्या सार्वजनिक विकास साधण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र गोदरी येथील बंजारा समाजाचा कुंभ मेळावा घेऊन एक प्रकारचे सामाजिक दिशाभूल करण्याचा प्रयत्न अशा आरोप गोरसेनेचे पुसद तालुका अध्यक्ष जय राठोड यांनी केले आहे