विहिरीच्या बीलाची चौकशी करा गावकऱ्यांची मागणी

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1फेब्रुवारी):- तालुक्यातील मौजे पोखर्णी ( वा.) येथील विध्यमान सरपंचाच्या कुटुंबातील तिन लाभार्थ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजेन अंतर्गत सन 2015 – 16 मध्ये विहिरीचे काम न करता बिल उचलून शासनाची दिशाभूल केली आसल्याची तक्रार गावकर्‍यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे.

दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे कि पोखर्णी ( वा. ) येथील सरपंच कुटुंबातील लाभार्थी क्र .1) भागवत मदन वाळके यांनी विहिरीला कडे न टाकता बिल उचलून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. भागवत वाळके यांनी २,९६०००/- ( दोन लाख शहाण्णव हजार) एवंढे बिल उचलले आहे.त्याच प्रमाणे लाभार्थी क्र . 2 दत्ता मदन वाळके यांची गट नं 374 मध्ये जुनी विहीर आहे त्या विहिराचा फेर क्र . 370 आहे. दत्ता वाळके यांनी नवीन विहिर न करता जुनी विहीर दाखवून 300000/- ( तिन लाख ) रुपये उचलले आहेत.तसेच लाभार्थी क्र . 3 वसंत मदन वाळके यांनीदेखील विहिरीचे खोदकाम पूर्ण न करता 131000/ – ( एक लाख एकतीस हजार रुपये बिल उचलले आहे.

वरील तिन्ही लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यास हाताशी धरून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली आसल्याचे म्हटले आहे.या निवेदनावर राजेंद्र गणपती पंडित ( माजी सरपंच ) , पांडूरंग नारायण परकड,
उत्तम लिंबाजी वाळके ( ग्रामपंचायत सदस्य ) , अशोक रानबा पंडित( ग्राम पंचायत सदस्य ) , हनुमान माधव परकड,राजू सर्जेराव देवकते , रोहिदास मुळे,सिद्धेश्वर वाळके ( गुट्टे काका मित्रमंडळ ) ,गणेश शिवाजी वाळके ,मारोती सोपान पंडित ,हणुमान पंढरी देवकते , शिवलिंग आर्जुन देवकते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.