भव्य धम्म पदयात्रेला सर्व ताकदीने अभूतपूर्व प्रतिसाद..!!

28

🔹मराठवाड्यातील बौद्ध उपासक-उपासिकांचे मन:पूर्वक आभार..!

🔸चला बुद्धांच्या मार्गाने…चला अहिंसेच्या मार्गाने

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1फेब्रुवारी):-हा वैश्विक संदेश देण्यासाठी निघालेली ऐतिहासिक धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी मुंबई असा नियोजनबद्ध प्रवास करीत आहे. आज 15 व्या दिवशी भव्य धम्म पदयात्रा मराठवाड्यातील आपल्या प्रवासाचा एक टप्पा यशस्वी रित्या पूर्ण करित आहे. मराठवाड्यातील बौद्ध उपासक-उपासिका सर्वानी हा दाखवलेला उत्साह अभूतपूर्व होता. आणी जागो-जागी अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक तथागत बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन व थायलंडच्या भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले. हा प्रवास आव्हानात्मक होता.

धम्म पदयात्रेतील थायलंडचे एक-दोन भदंत गंभीर आजारी पडल्यामुळे आमच्या डॉक्टर मंडळीने तत्पर वैद्यकीय सेवा देवून केलेली धम्म सेवा कायम स्मरणात राहील. समता सैनिक दल, आमचे सर्व स्वयंसेवक, पोलिस प्रशासनाचे उत्तम सहकार्य व पत्रकार बांधवानी दिलेली प्रसिद्धी अत्यंत महत्वाची आहे. आपणा सर्वांच्या सदिच्छा, प्रेम आणि सहभाग यामुळे हा एक महत्वाचा टप्पा आम्ही सर्वांनी पूर्ण केला. मराठवाड्यातील माझ्या बौद्ध बांधवांनी धम्म पदयात्रेला दिलेला प्रचंड प्रतिसाद आमच्या साठी प्रेरणादायी आहे. सर्वांचे मनापासून आभार..!
..